Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

मित्रांच्या निधनाची तारीख एकच आणि कारणही एकच …

Date:

विनोद् खन्ना आणि फिरोज खान यांची मैत्री सर्वपरिचित अशी होती …
फिरोज खान यांचे निधन  देखील २७ एप्रिलला झाले होते. आज फिरोज खान यांचा स्मृतिदीन असून त्यांनी २७ एप्रिल २००९ रोजी जगाचा निरोप घेतला होता. गेल्या काही दिवसांपासून आजारी असलेल्या विनोद खन्ना यांची प्राणज्योतही आज, २७ एप्रिललाच मालवली. इतकेच नाही तर, या दोघांच्याही मृत्यूचे कारणसुद्धा एकच आहे. विनोद आणि फिरोज या दोघांचेही निधन कर्करोगामुळेच झाले.

बॉलिवूडमध्ये ‘लेडी किलर’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या फिरोज यांनी चार दशकांच्या कारकिर्दीत जवळपास ६० चित्रपटांमध्ये अभिनय केला होता. फिरोज खान यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘कुर्बानी’ (१९८०) या चित्रपटाने विनोद खन्ना ला प्रसिद्धी च्या शिखरावर पोहोचविले होते . या चित्रपटात फिरोज खान यांनी दिग्दर्शक, निर्माता आणि अभिनेता या तिहेरी भूमिका साकारल्या होत्या.  ‘कुर्बानी’ चित्रपटानंतर विनोद खन्ना आणि फिरोज खान यांच्यातील मैत्री अधिक घट्ट झाली.विनोद खन्ना आणि फिरोज खान यांनी ‘कुर्बानी’च्या आधी १९७६ मध्ये आलेल्या ‘शंकर शंभू’ या चित्रपटात एकत्र काम केले होते. त्यानंतर ‘दयावान’ या १९८८ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटातही या दोन्ही मित्रांनी एकत्र काम केले. या दोघांची मैत्री इतकी घट्ट होती की योगायोगाने त्यांच्या निधनाची तारीखसुद्धा एकच ठरल्याचा योग जुळून आला.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बँकॉकहून पुण्यात तस्करी:10.3 कोटींचे हायड्रोपोनिक गांजा पकडला-तिघांना अटक

पुणे-डायरेक्टरेट ऑफ कस्टम डिपार्टमेंट (डीआरआय) च्या पुणे, मुंबई शाखेतील...

भारत पाकिस्तानातील शस्त्रसंधीनंतर निर्माण झालेल्या प्रश्नांची उत्तरे केंद्र सरकारने द्यावी.

भारतीय सैन्यदलाच्या शौर्याला सलाम करण्यासाठी राजीव गांधींच्या बलिदान दिनी...