आजच्या दिवसात 300 महिलांना लसीकरण करण्यात येणार आहे.
पुणे-पुणे महानगरपालिकेच्या नगरसेविका अश्विनी कदम यांच्यावतीने आज पर्वती मतदार संघातील घरेलू कामगार यांच्यासाठी मोफत लसीकरण मोहीम खासदार सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात आली.या लसीकरण मोहिमेचे उद्घाटन सहाय्यक पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण व सहाय्यक कामगार आयुक्त विशाल घोडके यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी नगरसेविका अश्विनी कदम यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये कोरोना काळामध्ये कष्टकरी बांधवांवर विशेषता घरेलू व घरकाम करणाऱ्या महिलांवर काम नसल्यामुळे आर्थिक संकट आले आहे. लस घेऊनच कामावर या असेही त्यांना सांगण्यात येत होते. म्हणून त्यांना फ्रंटलाईन वर्कर वर्गात समाविष्ट करून लसीकरण करावे अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कडे केली असता सदरची मागणी मान्य होऊन आज घरेलू कामगारांचे लसीकरण करण्यास सुरुवात झाली.
याप्रसंगी कामगार सहाय्यक आयुक्त विशाल घोडके यांनीही कोरोना काळामध्ये घरेलू कामगारांच्या वर आलेल्या आर्थिक संकटाची दखल शासनाने घेतलेली असून या संदर्भामध्ये संदर्भातील योजनांचा लाभ सर्वांनी घ्यावा असं आव्हान देखील केलेले आहे.
सहाय्यक पोलीस आयुक्त सुष्मा चव्हाण यांनी ही घरेलू कामगार हा समाजातील अनन्यसाधारण घटक असून त्यांच्या समस्यांकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे असे नमूद केले व याप्रसंगी नगरसेविका अश्विनी कदम या घटकांसाठी घेत असलेल्या विशेष प्रयत्नांचे कौतुक केले.
याप्रसंगी राष्ट्रवादी पर्वती मतदार संघाचे अध्यक्ष नितीन कदम, दिलीप अरुंदेकर,अमोल ननावरे, तुषार नांदे, प्रविण खत्री, महादेव जाधव, अनिल रांजणे, राहुल खत्री, सचिन जमदाडे, संग्राम वाडकर, किशोर कदम, राजेंद्र डोंगरे, मयूर शिंदे, अरुण ढावरे, सोमनाथ खंडाळे, प्रसाद खंडाळे, अजय मिसाळ,सुरज बनसोडे सौरभ ढावरे, आदित्य देसाई, छायाताई मेधने, मनिषाताई मारणे इत्यादी उपस्थित होते.