मुंबई, दि.२६ : प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे यांनी आज वर्षा निवासस्थानी ध्वजारोहण करून वंदन केले. श्रीमती रश्मी ठाकरे यांनीही राष्ट्रध्वजास मानवंदना दिली.
यावेळी ध्वजास सलामी देणाऱ्या पोलीस पथकासह उपस्थित वरिष्ठ अधिकारी, कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.