पुणे- ज्या प्रमाणे महापालिकेने नायडू हॉस्पिटल मध्येप्रवेश करताना सॅनिटायझेशन कक्ष करून नागरी निर्जंतुकीकरणा ची सुविधा उपलब्ध केली आहे ,तशीच पण पोलिस व्हॅन मधून फिरती व्यवस्था पोलिसांसाठी उपलब्ध झाली आहे.
केरोना च्या वाढत्या प्रादुर्भावा मुळे पोलिस वसाहती सॅनिटायझेशन केेल्यानंतर आता पोलिस कर्मचाऱ्यांना “निर्जंतुकीकरणबाईल मिस्टिंग सॅनिटायझेशन वाहन” ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. देशामध्ये प्रथमच अशा पद्धतीने पोलिसांसाठी वेगळा उपक्रम राबविण्यात येत असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
अशी असेल ‘मोबाईल मिस्टिंग सॅनिटायझेशन वाहनसुविधा !
मोबाईल मिस्टिंग सॅनिटायझेशन वाहनाचे नामकरण संजीवनी असे करण्यात आले आहे. या गाडीमध्ये प्रेशर फॉगिंग सिस्टीम वापरण्यात आली आहे. सदर गाडीमध्ये कर्मचारीते 7 सेकंदांसाठी उभे राहिल्यास निर्जंतुकीकरण होऊन त्याचा परिणाम काही तासांसाठी राहतो. ह्या वाहनाद्वारे कर्तव्यास ज्या ठिकाणी पोलीस कर्मचारी कामास असतील त्या ठिकाणी जाऊन ही सुविधा देण्यास मदत होईल.
पोलिस थेट नागरिकांच्या संपर्कात येतात. त्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारचा संसर्ग होऊ नये, यादृष्टीने ही व्यवस्था करण्यात आली आहे. ही सुविधा ही बसविण्यासाठी पुणे पोलीस मोटर परिवहन विभागामधील वाहनाचा उपयोग करण्यात आला आहे.”
संजीवनी वाहनाचा अशा पद्धतीचा अभिनव प्रयोग केला जात असून भारतातील ही एकमेव सुविधा असल्याचा दावा पुणे पोलिसांनी केला आहे. दिवसभर राबणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी हा उपक्रम राबविला गेला आहे. ही सुविधा रोंधे एंटरप्रायजेस या कंपनीच्या दीपक रोंधे यांच्या मदतीने कार्यान्वित करण्यात आली आहे