पुणे शहरात सर्व माध्यमातीलपुणे महानगरपालिकेच्या शाळेतील ९ वी, १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी पुणे महानगरपालिकेकडून ऑनलाईन अभ्यासक्रम सुरु करावा अशी मागणी कॉंग्रेस चे ज्येष्ठ नेते माजी उप महापौर आबा बागुल यांनी महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांच्या कडे केली आहे .
बागुल यांनी असे हटले आहे कि,कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी फेब्रुवारी महिन्यापासून शालेय मुलांना सुट्ट्या देण्यात आल्या असून ९ वी, १० वी च्या मुलांना शैक्षणिक वर्ष २०२०-२१ चा अभ्यासक्रम सुरु करणे अत्यंत गरजेचे आहे. शिक्षण हक्क कायदा २०१० साली मंजूर झाला. या कायद्यान्वये प्राथमिक शाळेचे काम ८०० तास व माध्यमिक शाळांत १००० तास अध्यापनाचे काम व्हावे, असे अपेक्षित आहे. शासनाने शब्दांचा कीस काढून हे तास म्हणजे शाळा २०० ते २२० दिवस चालावी असे नक्की करून शासन आदेश काढला. म्हणजे सरळसरळ शाळा १४५ दिवस म्हणजे एकंदर पाच महिने बंद राहते. त्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व शाळा बंद असून पुन्हा केंव्हा शाळा सुरु होतील सांगता येत नाही. इयत्ता आठवी पर्यंत असेही मुलांना उत्तीर्ण करण्यात येते त्यामुळे प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना फारशी अडचण निर्माण होणार नसून माध्यमिक शाळांच्या विद्यार्थ्यांचे शाळेचे तास भरून काढणे मोठे कठीण होऊन त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण होणे शक्य होणार नाही असे एकंदरीत समजून येते. इयत्ता १० वी हा विद्यार्थ्यांच्या दृष्टीने टर्निंग पॉईंट असतो.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व शिक्षक व विध्यार्थी घरीच असून शाळेला विद्यार्थ्यांना संपर्क करणे सोपे असून पुणे महानगरपालिकेकडून ९वी व १० वीच्या विद्यार्थ्याना ऑनलाईन शिकवण्यास सुरुवात केल्यास मुलांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही. या दृष्टीने पाहता पुणे महानगरपालिकेच्या इयत्ता ९वी व १० वी मधील सर्व माध्यमांच्या विध्यार्थ्यांचा ऑनलाईन अभ्यासक्रम सुरु करावा यासाठी पुणे महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाला आदेश द्यावे ही विनंती.