Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

‘FU’ या ग्रँड म्युजिकल चित्रपटाचा ग्रँड म्युजिक लाँच

Date:

 

अमिताभ बच्चन आणि सलमान खान यांनी केलेल्या ट्विट मुळे जबरदस्त सेन्सेशन निर्माण झालेल्या ‘FU’  या सिनेमाच्या संगीत अनावरणाचा सोहळा  राज ठाकरे यांच्या हस्ते मुंबई येथे नुकताच पार पडला. अतिशय रॉकिंग अशा गाण्याच्या दमदार सादरीकरणामुळे कार्यक्रमाला चार चाँद लागले. या भव्य सोहळ्यासाठी मराठी चित्रपटसृष्टीतील तरुण कलाकारांसह अनेक दिग्गज कलाकार उपस्थित होते.

‘FU’ या चित्रपटाची निर्मिती कट टू कट प्रोडक्शन, महेश मांजरेकर, अभय गाडगीळ, महेश पटेल आणि दिनेश किरोडीयन यांनी केली असून T series प्रस्तुत करत आहेत, दिग्दर्शन स्वतः महेश मांजरेकर यांचे आहे. ‘FU’ चे संगीत ताज्या दमाचे संगीतकार विशाल मिश्रा आणि समीर साप्तीस्कर  यांनी केले आहे. तरुणाई म्हणजे सळसळता उत्साह, जिगरी यारी, रोमान्स्,  स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द आणि बंडखोरीची भाषा देखील. ‘FU’ या चित्रपटाचे संगीतदेखील असेच उत्साही, रोमँटिक आणि प्रसंगी बंडखोरदेखील आहे. या चित्रपटातील विविधरंगी, विविधढंगी अशी एकूण १४ गाणी आहेत जी एक से बढकर एक गायकांनी गायली आहे. चित्रपटात सोनू निगम, श्रेया घोषाल, अवधूत गुप्ते, प्राजक्ता शुक्रे, बेनी दयाल, सुखविंदर सिंग , नीती मोहन, जोनिता गांधी अशा अनेक गायकांनी गाणी गायली आहेत. आणि या चित्रपटाच्या संगीताचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या चित्रपटात सलमानची मैत्रीण युलीया वन्तूर हिने देखील एक गाणे गायले आहे.

ताज्या दमाचे संगीत असलेल्या या चित्रपटातील कलाकारदेखील ताज्या दमाचे आणि अतिशय उत्साही आहेत. चित्रपटाचे मुख्य आकर्षण म्हणजे आकाश ठोसरचा हा सैराट नंतर या पहिलाच चित्रपट असून त्याचा लूकदेखील अतिशय यूथफूल आणि ट्रेंडी असा आहे. आकाशसोबतच चित्रपटात संस्कृती बालगुडे, वैदेही परशुरामी, सत्या मांजरेकर, मयुरेश पेम, शुभम किरोडीयन, माधव देवचक्के इत्यादी कलाकार आहेत. तरुणाईला भुरळ पाडतील अशी रॉकिंग गाणी असणारा हा चित्रपट २ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महापालिकेतील कनिष्ठ अभियंत्याला 1 लाखाची लाच घेताना अटक

पुणे:पिंपरी महापालिकेत कनिष्ठ अभियंता म्हणून नोकरी करीत असलेल्यास...

“भारत गौरव ट्रेन – छत्रपती शिवाजी महाराज सर्किट” ९ जून पासून

पर्यटकांनी ऐतिहासिक़ पर्यटनाचा लाभ घ्यावा- पर्यटनमंत्री शंभूराज देसाईमुंबई, दि....

लोकशाही, संविधान व महाराष्ट्र धर्म वाचवण्याच्या लढाईत काँग्रेस शिवसेनेबरोबर: हर्षवर्धन सपकाळ.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मातोश्रीवर घेतली शिवसेना पक्ष...