गडहिंग्लज –छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवलेल्या स्वराजाचे शिलेदार जर कोण असतील , तर गड,किल्ले , मावळे यासोबतच झाडे सुद्धा हिंदवी स्वराज्याची शिलेदार आहेत , कारण शिवरायांच्या लढाया ह्या नेहमीच “गनिमी कावा” युद्धतंत्राच्या जोरवर झाल्या , हजारोंच्या संख्येने असणार्या मराठ्यांच्या सैन्याने लाखोंच्या संख्येने असलेल्या मोघलांना झुंजवले हे गनिमी काव्यानेच शक्य झाले , गनिमी कावा हा मोकळ्या मैदानात यशस्वी होत नाही , गनिमी कावा यशस्वी करायचा असेल तर घनदाट झाडीत गरजेच्या असतात , याचाच अर्थ शिवरायांच्या काळात घनदाट झाडी होती , कारण घनदाट झाडी नसती तर स्वराज्य साकार झालेच नसते म्हणूनच स्वराज्याचे खरे शिलेदार “झाडे” सुद्धा आहेत , म्हणूनच झाडे लावा , झाडे जगवा हीच खरी शिवजयंती असल्याचे मत प्रसिद्ध युवा व्याख्याते निलेश जगताप यांनी व्यक्त केले
गडहिंग्लज तालुक्यातील कडगाव येथील सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीतर्फे शिवजयंतीनिमित्त आयोजित ““ढाल तलवारीच्या पलीकडचे शिवराय” या विषयावर व्याख्यान देताना ते बोलत होते. जगताप म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास 1630 पासून आजही आपण ऐकतो. शिवाजी महाराजांच्याविषयी काहींनी चुकीचा इतिहास लिहून विकृती निर्माण केली आहे. छत्रपतींचा इतिहास सुर्यासारखा चकचकीत आहे. शिवाजी महाराज न्यायी राजा होता. म्हणून राज्यात सुखशांती होती. रयतेला न्याय मिळत होता. शक्तीपेक्षा युक्ती महत्वाची असते. कमी मावळे असतानादेखील महाराजांनी यश मिळविले.शिवरायांचा इतिहास सांगणे ,ऐकणे, त्यांच्या नावाने जय जयकार करणे खूप सोप्प आहे मात्र त्यांचा विचार आचरणात आणणे खूप अवघड आहे म्हणूनच प्रत्येकाने छत्रपतींचा इतिहास वाचावा आणि तो अंमलात आणावा असेही शेवटी निलेश जगताप यांनी सांगितले.
ओमकार ताशिलदार , संदीप मैंद , दिगंबर कुंभार म अव्दूत सेवले , संजय मंद्केकर , प्रमोद चौगुले , विजय पारीख , वित्तहा;ल बाप्पू पाटील , योगीराज दिलीप
प्रारंभी स्वागत विठ्ठलबाप्पू पाटील यांनी, ओंकार ताशिलदार यांनी पाहुण्यांचा प्रास्ताविकात परिचय करून दिला. शिवप्रतिमेचे पूजन निलेश जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे नियोजन संदीप मैनाद , दिगंबर कुंभार, अवदुत सेवले ,संजय मांडकेकर ,प्रमोद चौगुले ,विजय पारीख, योगीराज पाटील , दिलीप पाटील यांनी केले ,यावेळी सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाचे पदाधिकारी, विठ्ठल गणेश तरुण मंडळाचे सदस्य व नागरीक मोठय़ा संख्येने उपस्थित होते..