पुणे : अक्षयतृतीयानिमित्त भवानी पेठमधील शितलादेवी मंदिरासमोर श्री गणेश मित्र मंडळातर्फे ओम श्री स्वामी समर्थ पाणपोईचे उदघाटन नगरसेवक वनराज आंदेकर व नगरसेवक विशाल धनवडे यांच्याहस्ते फीत कापून करण्यात आले . यावेळी तेजेंद्र कोंढरे , ऋषिकेश कदम , हरिभाऊ कांबळे , गणेश डोंबाळे , मनोहर गुलापेल्ली , चंदन वंगारी , संतोष कटकम , अक्षय नागुल , तुषार आंदे , भारती कदम , सोनाली कदम , वैशाली कदम , अक्षय कदम आदी मान्यवर उपस्थित होते .
भवानी पेठ परिसर कष्टकरी वर्गाचा असून त्यांना कडक उन्हाळ्यात या कष्टकरी वर्गाची तृष्णा भागविण्यासाठी श्री गणेश मित्र मंडळातर्फे ओम श्री स्वामी समर्थ पाणपोई सुरु करण्यात आली आहे , अशी माहिती श्री गणेश मित्र मंडळाचे अध्यक्ष ऋषिकेश कदम यांनी दिली .