पुणे- ड्रेनेज लाईनमधील बीएसएनएलची कॉपर केबल चोरी करणा-या आंतरराज्यीय टोळीला जेरबंद करुन ८०,७०,०००/-रु.कि.चा मुद्देमाल पोलिसांनी येथे जप्त केला .यामध्ये ३५ लाखाची केबल आणि अन्य साहित्यात क्रेन, आयशर ट्रक व मोपेड गाडी चा समावेश आहे. पकडलेल्या भामट्यांच्या मध्ये दोघे दिल्लीचे ,एक हरियाणाचा , तिघे उत्तर प्रदेशचे असून तिघेजण हडपसर चे आहेत .
या प्रकरणी पोलिसांनी सांगितले कि,’
दिनांक ०८/०५/२०२६ रोजी रात्री ११ वा ते दि.०९/०५/२०२६ रोजी पहाटे ०३/०० वा चे पर्यत कोंबिग ऑपरेशन दरम्यान वानवडी पोलीस स्टेशन तपास पथकातील पोलीस उप-निरीक्षक अल्फाज शेख व तपास पथकातील पोलीस अंमलदार हे पोलीस स्टेशन हद्दीतील रेकॉर्डवरील आरोपी चेक करीत असताना पोलीस अंमलदार अर्शद सय्यद व गोपाळ मदने यांना त्यांचे बोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, हनीवेल कंपनीजवळ, आश्रय चहा हॉटेलसमोर हडपसर इंडस्ट्रीयल एरिया हडपसर पुणे येथे काही इसम हे संशयितरित्या ड्रेनेज पाईपलाईनचे झाकन काढुन त्यामधील कॉपरची केबल वायर क्रेनच्या साहाय्याने ओढुन बाहेर काढत असुन त्याचे तुकडे करुन एका आयशर ट्रकमध्ये टाकत आहेत. सदर बातमी पोलीस उप-निरीक्षक अल्फाज शेख यांनी तात्काळ वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना कळवली असता त्यांनी सदर ठिकाणी जावुन खात्री करुन कायदेशीर कारवाई करणेबाबत आदेशित केले.
या बातमीच्या अनुषंगाने पोलीस उप-निरीक्षक अल्फाज शेख व तपास पथकातील पोलीस अंमलदार यांनी या ठिकाणी जावुन तपास केला असता काही इसम हे ड्रेनेज पाईपलाईन मधुन कॉपरची केबल वायर क्रेनच्या साहाय्याने ओढुन बाहेर काढुन चोरी करताना मिळुन आले.या सर्वांना ताब्यात घेवुन त्यांना नाव पत्ता विचारले असता त्यांनी त्यांची नावे १) अस्लम सगीर खान, वय ३९ वर्षे रा. तिलकनगर, वेस्ट दिल्ली २) आरिफ बुंन्दुखाँ खान, वय ४० वर्षे रा. उत्तरप्रदेश ३) शोहेब हारुण खान वय २५ वर्षे रा. उत्तरप्रदेश ४) सलमान इद्रीस मलीक वय ३३ वर्षे रा. दिल्ली ५) नरेश कुमार श्रीशिवचरण वय ४३ वर्षे रा. हरियाणा ६) नवी मोहम्मद शान मोहम्मद वय ३५ वर्षे रा. उत्तरप्रदेश, ७) अनिस अन्सारी मोहम्मद गियासुद्दीन वय २२ वर्षे, रा. हडपसर पुणे ८) अफाक अन्सारी रफिक अन्सारी वय २२ वर्षे रा. हडपसर पुणे ९) प्रविण दादासाहेब बागुल वय ३३ वर्षे रा.एस. आर.ए. कॉलनी, शिंदेवस्ती, हडपसर, पुणे असे असल्याचे सांगितले. या आरोपींना अटक करुन वानवडी पोलीस स्टेशन येथे गु.र.नं.२०८/२०२६ भा.न्या.सं.क. ३०३(२),६०,३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस उप-निरी. अल्फाज शेख करीत आहेत.
या आरोपीकडुन ३४,८०,०००/-रु. किं. ची कॉपर वायर, वायर काढण्यासाठी वापरलेली क्रेन, आयशर ट्रक व मोपेड गाडी असा एकुण ८०,७०,०००/-रु.किं.चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

