एव्हरेस्टवीर आनंद व अक्षया यांच्या लग्नाची नोंद विश्वविक्रमामध्ये

Date:

2 3 45

पुणे येथे अभिनेता नाना पाटेकर यांच्या हस्ते “इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड” प्रमाणपत्राचे अनावरण

पुणे :-  पुणे विद्यापीठात संशोधन करणारा जागतिक विश्वविक्रमवीर आनंद बनसोडे याच्या नावे आजपर्यंत अनेक वेगवेगळे विक्रम आहेत. आनंदने आपली मैत्रीण अक्षया आरोटे हिच्यासोबत २६ जानेवारी २०१६ रोजी “भारतीय संविधानाचे वाचन करून”अनाथ मुलांच्या उपस्थितीत लग्न केले होते. या आगळ्यावेगळ्या लग्नाची नोंद आता “इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड” मध्ये झाली असून देशाचे संविधान वाचून झालेले जगातील एकमेव लग्न ठरले आहे. नुकतेच पुणे येथे अभिनेता नाना पाटेकर यांच्या हस्ते या प्रमाणपत्राचे अनावरण करण्यात आले. यावेळी आनंदचे गिर्यारोहणातील गुरु सुरेंद्र शेळके, आनंदचे फिटनेस गुरु विनोद पावसे, उद्योजक शेखर चिंचवडे ई. उपस्थीत होते.

२६ जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिनी आनंद बनसोडे याने आपली मैत्रीण अहमदनगर येथील अक्षया आरोटे सोबत संविधानाचे वाचन करून लग्न केले होते. हे लग्न अनाथ मुलांच्या उपस्थितीत “संस्कार फाउंडेशन” येथे पार पाडले होते. या लग्नातून स्वातंत्र, समता, बंधुता ई. भारतीय घटनेतील मुल्यांचा संदेश दिला होता. या लग्नाची सर्वच स्तरातून व देशविदेशातूनही  कौतुक झाले होते. “इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड” ने या लग्नाची दखल घेवून याची विश्वविक्रमासाठी निवड केली. नुकतेच याबाबत प्रमाणपत्र आनंदला  मिळाले असून याचे अनावरण अभिनेता नाना पाटेकर यांच्या हस्ते पुण्यात झाले. यापूर्वी आनंदने जगातील ४ खंडातील (आशिया , युरोप, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया) सर्वोच्च शिखरांवर भारताचे राष्ट्रगीत वाजवून विश्वविक्रम केले आहेत. शिवाय या प्रत्येक खंडातील  सर्वोच्च शिखरावर भारताच्या संविधानाची प्रस्तावना घेवून जाण्याचा विक्रमही आनंदने केला आहे. वेगळ्या पद्धतीने लग्न केल्याची नोंद ही विश्वविक्रमामध्ये झाल्यामुळे आनंद व अक्षया दोघेही विक्रमवीर झाले आहेत.

 

-आनंद बनसोडे (जागतिक गिर्यारोहक, विश्वविक्रमवीर , लेखक, प्रेरक वक्ता)

“हे आगळेवेगळे लग्न फक्त लग्न नसून त्यामध्ये स्त्री-पुरुष समानतेचा व स्वातंत्र, समता, बंधुता ई. चा एक धागा आहे. आपण प्रथम भारतीय आहोत ही कल्पना नात्यांमध्ये रुजवण्यासाठी संविधानाला सर्वस्व मानून आम्ही लग्न केले. त्याची नोंद विश्व विक्रमामध्ये झाल्यामुळे खूप आनंद होत आहे”

 

-अक्षया बनसोडे (कवियत्री व लेखिका)

“अश्या पद्धतीने माझे लग्न होईल याची कधी कल्पना केली नव्हती. आनंदच्या विचारांवर पूर्णपणे विश्वास ठेवून लग्न केले आणि लगेच त्याची दखल विश्वविक्रमाने घेतली याचा अभिमान वाटत आहे. नटसम्राट नाना पाटेकर सर यांनी केलेले कौतुक खूप आनंद देवून गेले.”

 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

“KFIL’वर्षाचा निव्वळ नफा 376 कोटी रुपये 

पुणे, भारत –7 मे 2026: कास्टिंग्ज आणि पिग आयर्नच्या भारतातील आघाडीच्या उत्पादकांपैकी एक, तसेच...

विद्युत कंपन्यांच्या राष्ट्रीय स्पर्धेत कुस्ती व खो-खो मध्ये महावितरण संघाला विजेतेपद

पुणे, दि. ८ मे २०२६: येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलामध्ये सुरु असलेल्या अखिल भारतीय विद्युत क्रीडा नियंत्रण मंडळाच्या ४७ व्या राष्ट्रीय स्पर्धेत महावितरणने कुस्तीच्या १० वजन गटामध्ये ५ सुवर्ण व २ रौप्य पदकांची कमाई करीत सांघिक विजेतेपद मिळवले. तर महावितरणच्या खो-खो संघाने या स्पर्धेवर एकतर्फी वर्चस्व ठेवत विजेतेपदकाची अपेक्षित कमाई केली. तसेच बास्केटबॉलच्या अंतिम लढतीत पंजाब संघाने विजेतेपद मिळवले. एमएसईबी होल्डिंग कंपनीद्वारे आयोजित या राष्ट्रीय स्पर्धेत शुक्रवारी कुस्तीच्या १० वजनगटामध्ये शुक्रवारी (दि. ८) अंतिम सामने झाले. यात विविध वजनगटानुसार अनुक्रमे विजेते व उपविजेते पुढीलप्रमाणे. ५७ किलो- १) सुदर्शन पाटील (महावितरण) व जर्नेलसिंग (हिमाचल प्रदेश), ६१ किलो- अश्विन मोरे (महावितरण) व सुरेश कुमार (हरियाणा), ६५ किलो- राजकुमार काळे (महावितरण) व अजय कुमार (हिमाचल प्रदेश), ७० किलो- रणवीरसिंग (पंजाब) व आनंद नागरगोजे (महावितरण), ७४ किलो- सुखबीरसिंग (हिमाचल प्रदेश) व नरेंदरसिंग (पंजाब), ७९ किलो- अखिल मुजावर (महावितरण) व शेरोसिंग (पंजाब), ८६ किलो- अजय कुमार (हिमाचल प्रदेश) व दीपक कुमार (राजस्थान), ९२ किलो- बलवीरसिंग (हिमाचल प्रदेश) व अरूण गौड (हरियाणा), ९७ किलो- अमोल गवळी (महावितरण) व मदन (हरियाणा), १२५ किलो- विजेंदरसिंग (हिमाचल प्रदेश) व प्रमोद ढेरे (महावितरण). यानंतर महावितरण विरुद्ध हरियाणा पॉवर संघामध्ये खो-खोची अंतिम लढत झाली. यात भारतीय खो-खो संघाचा कर्णधार प्रतिक वाईकर याच्यासह निशिकांत शिंदे, विराज कोटमकर, महेंद्र पाटील यांनी महावितरणच्या आक्रमण व संरक्षणामध्ये आक्रमकता कायम ठेवली आणि हरियाणा पॉवर संघाचा दोन गुण आणि एक डाव राखून एकतर्फी विजय मिळवला. कबड्डीमध्ये महावितरणने अंतिम फेरीत प्रवेश केला असून तुल्यबळ व मागील विजेता हिमाचल प्रदेशशी लढत होणार आहे. महावितरणने बीएसईएस दिल्ली संघाचा ३६  विरुद्ध १० असा एकतर्फी पराभव करीत अंतिम फेरी गाठली. तर हिमाचल प्रदेशने हरियाणा पॉवर संघाचा ४८ विरुद्ध २८ असा पराभव करीत अंतिम फेरीमध्ये महावितरणला आव्हान दिले आहे. बास्केटबॉलच्या अंतिम सामन्यात पंजाब संघाने (४५) हरियाणा संघाला (३०) १५ गुणांनी विजय मिळवत स्पर्धेतील विजेतेपद मिळवले. पंजाबकडून हरप्रित सिंग यांनी संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. तर तृतीय स्थानासाठी अत्यंत चुरशीच्या व शेवटच्या क्षणापर्यंत उत्कंठा निर्माण झालेल्या बास्केटबॉलच्या लढतीत महावितरण संघाने (२३) राजस्थान संघाचा (२१) केवळ २ गुणांनी पराभव केला. महावितरणकडून भारत मराठे यांनी शेवटच्या क्षणाला दोन गुणांची कमाई करीत संघाला विजयी केले. या लढतीत कृष्णा लाड, किशोर सपकाळे यांनीही चमकदार कामगिरी केली.  

अल्पवयीनांवरील अत्याचार प्रकरणांवर विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे व्यथित

थेऊर, लोणावळा, अकोला, कोल्हापूर आणि सोलापूर प्रकरणांत कठोर कारवाई,...