पुणे- पुण्याच्या विविध प्रश्नांवर बैठक आयोजित करणाऱ्या राज्याच्या नगरविकास खात्याच्या मार्फत मुंबईत घेण्यात आलेल्या बैठकीत विशेष म्हणजे केवळ महापौरांना बोलविले कि नाही यावरून राजकारण रंगत असताना या सरकारी बाबूंनी कॉंग्रेस आणि शिवसेना आणि मनसे या पक्षांच्या एका एका प्रतिनिधीलाही या बैठकीचे निमंत्रण देणे टाळून बैठक घेतल्याचे पुढे आले आहे. मात्र अद्याप या पक्षांच्यावतीने कोणीही याबाबत काहीही वक्तव्य केलेले नाही अगर आक्षेप घेतलेला नाही हे विशेष .
या संदर्भात खुद्द राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांनी सार्वजनिक केलेल्या या बैठकीच्या निमंत्रण पत्राचाच हवाला दिला जातो आहे. राज्य शासनाच्या नगरविकास खात्याचे कार्यासन अधिकारी दिलीप वनीरे यांच्या सहीचे हे निमंत्रण आहे. म्हणजेच हि बैठक सरकारी बैठक होती राष्ट्रवादी पार्टीची वैयक्तिक बैठक नव्हती .राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्या अध्यक्षते खाली होणाऱ्या बैठकीचे हे निमंत्रण पत्र २८ तारखेचे आहे आणि बैठक २९ तारखेला म्हणजे आज दुपारी अडीच वाजता ठेवण्यात आली होती .ज्याचा विषय ‘ पुणे महानगरपालिका क्षेत्रातील विविध प्रश्नांसंदर्भात बैठक ‘ असा अधोरेखित करण्यात आला होता . या बैठकीचे निमंत्रण तब्बल २३ जणांना देण्यात आले होते त्यात काहीजण व्हिडीओ कॉन्फरस द्वारे सहभागी व्हावेत अशांची नावे अधोरेखित करण्यात आले होते . ती नावे होती महापौर पुणे, विरोधीपाक्ष्नेत्या दिपाली धुमाळ पुणे ,आयुक्त महानगरपालिका ,पुणे, विशेष कार्यकारी अधिकारी ,जिल्हा परिषद ,पुणे .आणि मुख्य अधिकारी म्हाडा पुणे .यांनी व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे बैठकीस उपस्थित राहण्याचे निर्देश या पत्रान्वये देण्यात आले होते .
मंत्रालयातील काही खात्यांचे सचिव दर्जाचे अधिकारी आणि अन्य काही राजकीय प्रतिनिधी या बैठकीस निमंत्रित करण्यात आले होते . या राजकीय प्रतिनिधी मध्ये मात्र केवळ राष्ट्रवादीच्या बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे, आमदार चेतन तुपे, आमदार सुनील टिंगरे यांची नावे होती. या शिवाय अन्य कोणत्याही राजकीय पक्षाच्या प्रतिनिधीस या बैठकीस बोलाविण्यात आले नव्हते हे या पत्रावरून स्पष्ट होते आहे .
यामुळे केवळ व्हिसी द्वारे भाजपचे महापौर निमंत्रित होते , अन्य सर्व राष्ट्रवादीचेच निमंत्रित होते जास्तीत जास्त अधिकार्यांचाच यात समावेश होता . कॉंग्रेस आणि शिवसेना या महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेल्या पक्षांच्या प्रतिनिधींना देखील या बैठकीचे निमंत्रण देण्यात आले नव्हते. हे विशेष मनसे तर दूरच राहिली. आरपीआय चा हि यात समावेश नव्हता .