जातीय विषमता नष्ट होवून सामाजिक समता निर्माण होणे गरजेचे-राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

Date:

अविरत कार्यरत सेवावृत्तीचा सन्मान सोहळ्याचे आयोजन
पुणे, दि.१७:- समाजात जातीय विषमता नष्ट होवून सामाजिक समता निर्माण होणे गरजेचे असून युवा पिढीने मनात सामाजिक समतेच्या भावनेची जोपासना करीत समाजातील उपेक्षित घटकांना पुढे नेण्याचे काम करावे, असे मत राज्यपाल भगत शिंह कोश्यारी यांनी व्यक्त केले.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त समर्थ युवा प्रतिष्ठान आयोजित कोरोना संकटकाळात अविरत कार्यरत सेवावृत्तीचा सन्मान सोहळा राज्यपाल श्री. कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत भांडारकर इन्स्टिट्यूट येथील नवलमल फिरोदिया सभागृहात पार पडला. यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार गिरीष बापट, महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार चंदकांत पाटील, जगदीश मुळीक, माधुरी मिसाळ, समर्थ युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेश पांडे आदी उपस्थित होते.
राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले, कोरोनाच्या काळात डॉक्टर, पोलीस, सामाजिक संस्था, उद्योजक, अशा विविध घटकांनी केलेली कामगिरी अतुलनीय आहे. अशा पद्धतीने चांगली कामगिरी सतत केल्यास देश प्रगतीपथावर जाण्यास मदत होते. निष्कलंक, निष्पाप, निःस्वार्थी नेतृत्वाच्या शब्दाला महत्व असते असे त्यांनी सांगितले.
खासदार श्री.बापट म्हणाले, सत्कार हा सतप्रवृत्तीचा होत असतो. कोरोनाच्या काळात सामान्य माणसाला मदत करुन अनेकांनी समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे. सर्वजण मिळून समाजासाठी काम करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
राज्यपाल श्री. कोश्यारी यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु प्रा.डॉ. नितीन करमळकर, डी.वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी.डी. पाटील, दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष पद्मश्री मिलिंद कांबळे, पुणे प्लॅटफॉर्म फॉर कोविड-१९ चे मुख्य समनव्यक सुधीर मेहता, पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष मंगेश कोळपकर, इस्कॉनचे संजय भोसले, पुणे मनपाचे आरोग्य व स्वच्छता विभागासाठी महापौर मुरलीधर मोहोळ, सहायक आरोग्य प्रमुख डॉ. संजीव वावरे व आरोग्य निरीक्षक कविता शिसोलकर यांचा एकत्रित तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीचे प्रतिनिधी अश्विनीकुमार व महेश कर्पे यांचा सत्कार करण्यात

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

🟥 सोमवार पेठेतील जीर्ण दुमजली वाडा कोसळला

🟨 रहिवाशांना आधीच सुरक्षित बाहेर काढल्याने जीवितहानी टळली; धोकादायक...

संकटसमयी धावून आले ‘पीएमआरडीए’चे देवदूत! मुसळधार पावसात युद्धपातळीवर बचावकार्य; शेकडो नागरिकांचे वाचवले प्राण!

मावळ, लोणावळा परिसरात दरड कोसळल्याच्या दुर्घटनांनंतर 'पीएमआरडीए'च्या 'पीडीआरएफ'कडून तात्काळ...

महापालिकेकडून ७५ कुटुंबांतील ३०० नागरिकांना निवारा

पुणे, दि. ६ :पुणे शहरात सुरू असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर...