एस्सेन ग्रुप राबविणार मुली शिकवा मुली शिकवा- मुली वाचवा सामाजिक मोहिम

Date:

पुणे : पुणे-पिंपरी-चिंचवड मधील अनेक सामाजिक संस्थे व कार्यकर्त्यांच्या सहकार्याने गृह निर्माण क्षेत्रातील नावाजलेल्या एस्सेन ग्रुप ने मुली शिकवा मुली शिकवा- मुली वाचवा, कन्या भ्रूण हत्या थांबवा ही सामाजिक मोहिम 2017 या वर्षभर राबविण्याची घोषणा केली आहे.या बाबत एस्सेन ग्रुपचे चेअरमन भीमसेन अग्रवाल म्हणाले कि हे सामाजिक कार्य आम्ही सामाजिक भावनेतून हाती घेतले आहे. या सामाजिक मोहिमे अंतर्गत पुणे जिल्हयात मुलींना जन्म देणार्‍या मातेचा विशेष सम्मान अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत केला जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुली शिकवा मुली वाचवा  संकल्पनेस आमचा पूर्ण पाठिंबा असून आम्ही ही योजना पूर्ण गांभीर्याने  सामाजिक भावनेतून वर्षभर राबविणार आहोत. एस्सेन ग्रुपचे युवा संचालक सतीश व नरेंद्र अग्रवाल सामाजिक कार्यात नेहमी पुढे असतात. रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिरांचे ही आयोजन आम्ही करीत असतो. भीमसेन अग्रवाल ने मुला- मुली मधील भेदभाव नष्ट करून दोघांना शिकण्याची समान संधी देण्याचे व कन्या भू्रण हत्या बंद करण्याचे आवाहन केले. ते म्हणतात महाराष्ट्रातील स्त्री-पुरूष जन्मदरात घट होत असून 2016 मध्ये 1 हजार मुलांमागे 899 मुली होत्या. आईच्या पोटात गर्भावस्थेत मुलींना मारून टाकण्याच्या विकृतीने समाजाला ग्रासले आहे. स्त्रीचा जन्मच नाकारणे ही क्रूर आणि नीच कृती आहे. मुलगी नको ही मानसिकताच बदलली पाहिजे. मुलीला जन्म दिला नाही तर आपला वंश कसा वाढणार.पुणे , पिंपरी-चिंचवड मधील सर्व सरकारी कार्यालय निम-सरकारी कार्यालय, शिक्षण संस्था, कारखान्यात जाऊन आमचे कार्यकर्ते मुली शिकवा, मली वाचवा, स्त्री भू्रण हत्या बंद करा, महिलांच्या सुरक्षे व सम्मान बाबत जनजागृती वर्षभर करतील.
एस्सेन ग्रुप बाबत : 16 वर्षापासून एस्सेन ग्रुप पिंपरी-चिंचवड मधे गृह प्रकल्प निर्माण क्षेत्रात कार्य करीत आहेत.16 वर्षात एस्सेन ग्रुप ने पिंपरी-चिंचवड मधे अनेक दर्जेदार गृह व व्यवसायिक प्रकल्प बांधलेत. या गु्रपचे चेअरमन भीमसेन अग्रवाल चा दूरदृष्टी व खंबीर नेतृत्वाखाली सतीश भीमसेन अग्रवाल व नरेंद्र भीमसेन अग्रवाल संचालक म्हणून काम बघतात.  एस्सेन ग्रुप ने सर्व सामान्य माणसां करिता परवडणार्‍या दरात चिखली-मोशी परिसरात ऐश्‍वर्यम हमारा या सर्व सुविधायुक्त व दर्जेदार गृहप्रकल्प सुरू केले आहे.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ज्येष्ठ नागरिकाची १०.७४ कोटींची फसवणूक; फरार आरोपी सायबर पोलिसांच्या जाळ्यात

सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून घातली होती भीती; आरोपी रोहन...

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ढोल-ताशा पथकांना सरावासाठी जागा व परवानगी उपलब्ध करून द्यावी – महापौर मंजुषा नागपुरे

पुणे-पुण्याची ऐतिहासिक व वैभवशाली गणेशोत्सव परंपरा जपणाऱ्या ढोल-ताशा पथकांना...

लघु नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी पुण्यात प्रादेशिक कार्यशाळा

‘Small River Rejuvenation Framework’वर तज्ज्ञांचे मंथन; आयुक्त नवल किशोर...

कात्रज-कोंढवा रस्ता, गंगाधाम उड्डाणपूल आणि नवले पुलाजवळील सर्व्हिस रोडच्या कामांना गती

महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांची प्रत्यक्ष पाहणी; भूसंपादन,...