एम. ए. रंगुनवाला ‘सेव्हन-ए-साईड’ फुटबॉल स्पर्धेस प्रारंभ स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात एम.ए.रंगूनवालाची विजयी सलामी
पुणे:
‘ महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’च्या ‘एम. ए. रंगुनवाला इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अॅण्ड रिसर्च’च्या वतीने आयोजित आठव्या ‘सेव्हन-ए-साईड’ फुटबॉल स्पर्धेस प्रारंभ झाला आहे. ही स्पर्धा आझम कॅम्पस मैदानावर घेण्यात येत आहे. दिनांक 27 ऑगस्ट रोजी स्पर्धेचा समारोप होईल, अशी माहिती एम. ए. रंगुनवाला इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अॅण्ड रिसर्च’च्या प्राचार्य अनिता फ्रान्झ यांनी पत्रकाद्वारे दिली.
स्पर्धेत 11 संघ सहभागी झाले आहेत. स्पर्धेच्या प्रारंभी एम.ए.रंगूनवाला आणि ‘टीळक महाराष्ट्र विद्यापीठ’ यांच्यात सामना खेळला गेला. एम.ए.रंगूनवाला महाविद्यालयाने सामना 9-0 असा विजय मिळवला.
विद्यार्थ्यांमध्ये शारिरीक क्षमता विकसित करणे, स्वत:मधील आत्मविश्वास वाढविण्यास मदत होणे या प्रमुख हेतूने या स्पर्धेचे आयोजन केले जाते, असे प्राचार्य अनिता फ्रान्झ यांनी सांगितले.
आज दिनांक 25 ऑगस्ट रोजी ‘एम. ए. रंगुनवाला इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अॅण्ड रिसर्च’ आणि ‘हॉटेल फोर पॉईंट शेरटन पुणे’ यांच्यात सामना सुरू आहे.