वानवडी गावमधील एकता नागरी सहकारी पतसंस्था मर्यादितच्यावतीने यंदाच्या वर्षी १५ टक्के लाभांश जाहीर करण्यात आला . पतसंस्थेचे अध्यक्ष प्रफुल्ल जांभुळकर यांनी जाहीर केला . वानवडीमधील महात्मा फुले सांस्कृतिक भवनमध्ये झालेल्या सभागृहात झालेल्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत हा लाभांश जाहीर केला . यावेळी एकता नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालकवर्ग , सभासद , खातेदार , ठेवीदार , दैनंदिन ठेव प्रतिनिधी कर्मचारी वर्ग उपस्थित होते . या बैठकीचे उदघाटन महापौर प्रशांत जगताप यांच्याहस्ते दीपप्रजवलन करून करण्यात आले . यावेळी मोहीम अधिकारी भगवानराव शिवराम वा घोले , रघुनाथ कचरे , ऑडिटर मंगेश शेंडे , राखी रासकर आदी मान्यवर उपस्थित होते .
पतसंस्थेच्या ठेवी ३१ मार्च २०१६ पर्यंत १९ कोटी ४३ लाख , कर्जे १४ कोटी १५ लाख , निव्वळ नफा ३९ लाख रुपये , एन. पी. ए. शून्य टक्के असून ऑडिट वर्ग ” अ ” आहे . पतसंस्थेला हवेली तालुक्यामध्ये कार्यक्षेत्र विस्तारासाठी महाराष्ट्र राज्य सहकार खातेकडून नुकतीच परवानगी मिळाली आहे . अशी माहिती पतसंस्थेचे अध्यक्ष प्रफुल्ल जांभुळकर यांनी दिली . अहवाल वाचन पतसंस्थेचे संचालक गणेश जांभुळकर यांनी केले . यंदाचा आदर्श कर्मचारी पुरस्कार पतसंस्थेच्या व्यवस्थापिका अनुसया ससाणे , आदर्श दैनंदिन ठेव कर्मचारी पुरस्कार श्रीमती सुनीता लडकत व सर्वाधिक दैनंदिन ठेव पुरस्कार भाऊसाहेब परभणे याना प्रदान करण्यात आला .
यावेळी पतसंस्थेचे संस्थापक सुनीलभाऊ जांभुळकर , उपाध्यक्ष किसन सातव , सचिव संजय घनवट व सर्व संचालक वर्ग उपस्थित होते . यावेळी दरवर्षीप्रमाणे सभासदांना भेटवस्तू देण्यात आल्या .