मुंबई-बंडखोर शिंदे गट आणि भाजप यांच्या सत्तास्थापनेसंदर्भात खलबते सुरू आहेत. लवकरच राज्यपालांना अविश्वासदर्शक ठराव देण्यासंदर्भात हालचालीही सुरू आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही नुकतेच दिल्लीला गेले आहेत. ते अमित शहांची भेट घेऊन या नव्या सत्ता समीकरणावर चर्चा करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदे गटाने भाजपसह सरकार स्थापन करण्यासंदर्भात मंथन केले आहे. यानुसार जर शिंदे गटाने भाजपसोबत सत्ता स्थापन केली. तर शिंदे गटातील7 जण कॅबिनेट मंत्री आणि 6जण राज्यमंत्री बनण्याची शक्यता आहे. सूत्रांनुसार, उपमुख्यमंत्रिपदासाठी एकनाथ शिंदे यांचे नाव समोर ठेवण्यात आले आहे. तर गुलाबराव पाटील, शंभुराजे देसाई, संजय शिरसाट, दीपक केसरकर, संजय शिरसाट, उदय सामंत यांना ही मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजप आणि एकनाथ शिंदे गटामध्ये संभाव्य मंत्रिमंडळाबाबत चर्चा झाली आहे. यामध्ये भाजपच्या कोट्यात 18 कॅबिनेट आणि 10 राज्यमंत्री पदासह 28 मंत्री असणार आहे.