पुणे, दि. 15 : शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ मर्या., जुन्नर,जि.पुणे यांच्या मार्फत अनुसुचित जमातीचे नागरिकाना कळविण्यात येते की अहमदनगर व पुणे जिल्हयातील अनुसुचित जमातीचे व्यक्तीना काही दलाल प्रकरणे, योजना मंजुर करुन देतो असे सांगुन त्यांचेकडुन त्यापोटी मोठ्या प्रमाणात रक्कमा घेत आहेत. शबरी आदिवासी महामंडळात कोणत्याही प्रकारची सबसीडी किंवा अनुदान मिळत नाही तसेच कोणत्याही प्रकारची कर्जमाफी होत नाही. कर्ज मंजूर झाल्यानंतर संपुर्ण रक्कम व्याजासहीत परतफेड करावी लागते. प्रकरणे, योजना मंजुर करुन देतो असे सांगणाऱ्या इसामापासून अथवा दलालापासून सावध रहावे व असे करताना कोणीही आढळल्यास त्वरीत लाचलुचनत विभाग अथवा नजीकच्या पोलीस स्टेशनच्या ठाणे अंमलदाराशी संपर्क साधवा असे आवाहन महामंडळाच्या जुन्नर येथील शाखा व्यवस्थापकांनी एका प्रसिध्दीपत्रान्वये केले आहे.