पुणे : पुणे ग्रामीण जिल्हयातील लोणीकंद पोलिस स्टेशन हद्दीत पेरणेफाटा येथे 1 जानेवारी 2018 रोजी विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून मोठया प्रमाणात जनसमुदाय वाहनांसह येत असतात. या विजयस्तंभास 200 वर्ष पुर्ण होत आहे. त्याअनुषंगाने राज्यभरातून विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी अंदाजे 9 ते 10 लाख इतका जनसमुदाय येण्याची दाट शक्यता आहे. या कार्यक्रमास महाराष्ट्र तसेच इतर राज्यातूनही जनसमुदाय बसगाडया, एस.टी.बसेस, चारचाकी,जीप,टेम्पो, मोटारसायकल मधून येत असतो. त्यामुळे पुणे-नगर राज्य महामार्गावरील वाहतूकीवर परिणाम होवून वाहतूकीची मोठया प्रमाणावर कोंडी होते. महामार्गावरील वाहतूक वळविण्याकरीता पर्यायी मार्ग उपलब्ध नसल्याने 1 जानेवारी रोजी सकाळी 6 वाजलेपासून ते रात्री 10 वाजेपर्यंत पुणे-नगर मार्गावरील वाहतूक पुढील प्रमाणे वळविण्यात आली आहे.
पर्यायी मार्ग- अहमदनगर बाजूकडून पुण्याकडे येणारी अवजड वाहतूक शिक्रापूर चाकण मार्गाने मुबईकडे वळविण्यात आली आाहे. पुण्याहून शिरुर, नगर रोडकडे जाणारी वाहतूक सोलापूर रोडने चौफुला रोडने न्हावरा फाटा शिरुर नगरकडे वळविण्यात आली आहे.
पार्किंग व्यवस्था- शिक्रापूर बाजूकडून येणारी वाहने- कोरेगाव भिमा बाजारतळ व इतर मोकळया जागेत केली आहे. पुणे लोणीकंद कडून येणारी वाहने- पेरणे टोलनाक्याच्या अलीकडे मोकळया जागेत पार्किंग करण्यात आली आहे. पुणे लोणीकंद कडून येणारी वाहने-लोणीकंद कुस्त्याचे मैदान येथे पार्किंग करावीत. तरी नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, अशी माहिती पुणे ग्रामीण जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.
0000