पुणे: जिल्हा प्रशासनातर्फे क्रांतिसिंह नाना पाटील यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात झालेल्या या कार्यक्रमात, सामान्य प्रशासन विभागाच्या उपायुक्त कविता द्विवेदी यांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी, महसूल शाखेचे उपजिल्हाधिकारी प्रताप जाधव, तहसिलदार मीनल मिरजकर,तसेच विभागीय आयुक्त कार्यालय,जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा माहिती कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.