Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

महाराष्ट्रात ‘फुटबॉल फिव्हर’ निर्माण करणार क्रीडा मंत्री विनोद तावडे यांचे प्रतिपादन

Date:

पुणे: आंतराष्ट्रीय फुटबॉल संघटनेतर्फे (फिफा) 6 ते 28 ऑक्टोबर,2017 या कालावधीत 17 वर्षाखालील खेळाडूंच्या फुटबॉल विश्व चषक स्पर्धेचे भारतामध्ये आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रात नवी मुंबई  येथील डी.वाय.पाटील स्टेडीयम येथे या स्पर्धेतील पाच सामने खेळविण्यात येणार आहेत. या स्पर्धेच्यानिमित्ताने फुटबॉल खेळ लोकप्रिय व्हावा यासाठी, महाराष्ट्रात फुटबॉल फिव्हर निर्माण करणार असल्याचे प्रतिपादन शालेय शिक्षण तथा क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनी आज येथे केले.

17 वर्षाखालील खेळाडूंच्या फुटबॉल विश्व चषक स्पर्धेच्यानिमित्ताने येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात क्रीडा विभागाचे वरिष्ठ अधिकारी, क्रीडा संघटक, आयोजन समिती सदस्य यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना क्रीडा मंत्री विनोद तावडे बोलत होते.

यावेळी क्रीडा मंत्री तावडे म्हणाले, शालेय विद्यार्थ्यांमध्ये फुटबॉल खेळाविषयी जनजागृती व्हावी यासाठी, ज्या शाळांमध्ये फुटबॉल खेळ प्राधान्याने खेळण्यात येतो, त्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना यासंदर्भात अधीक मार्गदर्शन करण्यात येईल. ज्या शाळांमध्ये हा खेळ खेळण्यात येत नाही, त्या शाळांवर विशेष लक्ष देऊन तेथील विद्यार्थ्यांनी फुटबॉल खेळाकडे वळावे यासाठी क्रीडा विभागाने विशेष प्रयत्न करावे. स्पर्धेच्यानिमित्ताने सुमारे 20 हजार शाळांमध्ये प्रत्येकी पाच असे एकूण 1 लाख फुटबॉलचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच राज्यातील जवळपास 7 हजार क्रीडा शिक्षकांना यामध्ये सहभागी करुन घेण्यात येणार आहे. यासोबत 13 वर्षाखालील आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेचे आयोजन, 29 ऑगस्ट या राष्ट्रीय क्रीडा दिनी 10 लाख मुला-मुलींनी फुटबॉल खेळणे, विश्वचषक स्पर्धेच्या कालावधीत सर्व शाळा, महाविद्यालयांमध्ये फुटबॉल फेस्टीवलचे आयोजन करणे आदी उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. प्रधानमंत्री यांनीसुध्दा या स्पर्धेच्यानिमित्ताने सर्व तरुणांना फुटबॉल खेळाशी जोडण्याबाबत आवाहन केले असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

बैठकीला क्रीडा विभागाच्या उपसचिव चारुशिला चौधरी, सहसंचालक नरेंद्र सोपल, क्रीडा उपसंचालक आनंद व्यंकेश्वर, उपसंचालक चंद्रकांत कांबळे, सहायक संचालक व नेमबाज नवनाथ फरताडे, राज्यातील क्रीडा उपसंचालक, जिल्हा क्रीडा अधिकारी, क्रीडा संघटक आशिष पेंडसे उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

वारकऱ्यांची निःस्वार्थ सेवा म्हणजे पांडुरंगाचा प्रसाद:उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची भावना

वारकऱ्यांसाठी फिरता दवाखाना उपक्रमाचा शुभारंभ 'सिंबायोसिस' व सौ. शीला राज...

पुण्यात पाऊस सुरूच… मुठेत आता 15 हजाराचा विसर्ग

पुणे: शहर आणि परिसरात गेल्या दोन दिवसांपासून संततधार पाऊस...

“स्त्रियांच्या गरजा समजून घेतल्याशिवाय सेवा अपूर्ण”- उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचा ‘आरोग्यवारी’ उपक्रमात विशेष सहभाग

वारीतील महिला सुरक्षेसाठी प्रशासन सज्ज; ‘आरोग्यवारी’ उपक्रमातून व्यापक व्यवस्था पुणे,...