Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

कार्यक्रमातून उलगडली गुरुदत्त-गीता दत्त जीवन गाथा!

Date:

पुणे –
भारतीय चित्रपटाच्या पडद्यावर माणुसकीचा हुंकार, वेदनेची फुले आणि दुःखाचे नक्षत्र फुलवणार्‍या गुरूदत्त – गीता दत्त या अविस्मरणीय जोडीची जीवनगाथा ‘गुरू-गीता’ या सांगितिक कार्यक्रमातून उलगडली!
निमित्त होते, ‘रोटरी क्लब ऑफ पुणे गांधी भवन’ आयोजित ‘महामार्ग सुरक्षा अभियान’ च्या निधी संकलनासाठी आयोजित ‘गुरू-गीता’ या सांगितिक कार्यक्रमाचे.
गुरुदत्तचे 39 वर्षांचे आयुष्य, 19 वर्षांची कारकीर्द गुुरुदत्त – गीता दत्त जोडीचे 11 वर्षांचे सहजीवन हा हिंदी सिनेसृष्टीचा अनमोल ठेवा आहे. 26 मे या त्यांचा लग्नाच्या वाढदिवसानिमित्त हा ठेवा ‘गुरु-गीता’ कार्यक्रमातून पुणेकरांसमोर आला.
यशवंतराव चव्हाण नाट्यगृह (कोथरूड) येथे हा कार्यक्रम शुक्रवारी सायंकाळी झाला. शेखर नाईक यांची संकल्पना-दिग्दर्शन असलेला या कार्यक्रमात मधुरा दातार, स्वरदा गोखले, मुक्ता जोशी, धवल चांदवडकर यांनी गुरुदत्त यांच्या चित्रपटातील तसेच गीता दत्त यांनी गायलेली गीते सादर केली. केदार परांजपे यांनी संगीत संयोजन केले. मधुरा वेलणकर यांनी निवेदन केले.
‘बहारे फिर भी आयेगी’, ’सुन सुन जालिमाँ’, ‘कैसा जादू बलम तुने’, ‘थंडी हवा – काली घटा’, ‘आँखियाँ भूल गयी है सोना’, ’अपने पे है भरोसा तो एक दाव लगा ले’, ‘तकदीर बनाले’, ‘हम आपकी आँखो में’, ‘जाने क्या तुने कहाँ’, ’जहा नाझ है हिंद पे वो कहों है’, ‘ये लो मैं हारी पिया’, अशी अनेक सुरेल गीते या वाद्यवृंदाने सादर केली.
‘रोटरी क्लब ऑफ पुणे गांधी भवन‘चे नियोजित अध्यक्ष गणेश जाधव यांनी ‘महामार्ग सुरक्षा अभियाना’च्या आगामी वर्षभरातील उपक्रमांची माहिती दिली. मावळते अध्यक्ष मिलिंद ताम्हणकर, प्रांतपाल अभय गाडगीळ यांनी मनोगत व्यक्त केले. द्रूतगती महामार्ग अपघातात मृत पावलेले अभिनेते आनंद अभ्यंकर यांच्या पत्नी अंजली अभ्यंकर, अभिनेते अक्षय पेंडसे यांचे बंधू तन्मय पेंडसे यांनीही मनोगत व्यक्त केले. आणि महामार्गावर कोणाचेही प्राण जाऊ नयेत अशा उपाययोजना करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले.
पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर दरवर्षी 100 जण मृत्यूमुखी पडतात. पेट्रोलिंग वाहनांपासून रुग्णवाहिकेपर्यंत आणि जीपीएस ट्रॅकर पासून पोलिसांसाठी क्युबिकलपर्यंत अनेक गोष्टी पुरविण्याची गरज आहे. फक्त 96 पोलीस महामार्गाच्या सुरक्षेसाठी तैनात आहेत. ती संख्या वाढविण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे, अशी सर्व माहिती तन्मय पेंडसे यांनी दिली.
डॉ. स्वरदा जाधव यांनी सूत्रसंचालन केले. ‘डीएचएफएल’चे अमित कर्वे ‘गंगोत्री ग्रीनबिल्ड’चे मकरंद केळकर इत्यादी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

व्याकरणाला भाषा विज्ञानाची जोड हवी : प्रा. यास्मिन शेख

शंभरी पार केलेल्या प्रा. यास्मिन शेख यांचा सुहृदांच्या उपस्थितीत...

“शेतकऱ्यांचे संरक्षण अत्यावश्यक, हिंगोलीत बोगस खत विक्री प्रकरणी तातडीने कारवाई करा”

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या कृषी विभागाला सूचना हिंगोली, दि....