Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

सांसद आदर्श ग्राम योजनेअंतर्गत सुदुंबरे गावातील योजनांचा लोकार्पण सोहळा

Date:

 पुणे : 
खासदार अ‍ॅड.वंदना चव्हाण यांनी सांसद आदर्श ग्रामयोजनेअंतर्गत दत्तक घेतलेल्या सुदूंबरे गावातील योजनांचा लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या हस्ते बुधवार, दिनांक 31 मे रोजी सायंकाळी 4 वाजता सुदुंबरे, ता. मावळ, जि. पुणे येथे या लोकार्पण समारंभ होणार आहे, अशी माहिती खासदार अ‍ॅड. वंदना चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली. यावेळी संजीवनी जोगळेकर (सुदुंबरे गावाच्या प्रमुख समन्वयक) उपस्थित होत्या.
यावेळी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष बापट, खासदार अ‍ॅड. वंदना चव्हाण, खासदार श्रीरंग बारणे(मावळ), आमदार संजय भेगडे (मावळ), विश्वासराव देवकाते (अध्यक्ष जिल्हा परिषद, पुणे), गुलाबराव म्हाळसकर (सभापती, पंचायत समिती, मावळ), शांताराम कदम (उपसभापती, पंचायत समिती, मावळ) आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तसेच सौरभ राव (जिल्हाधिकारी), सुभाष भागडे (उपविभागीय अधिकारी मावळ), दौलत देसाई (मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे) उपस्थित असणार आहेत.
सुदुंबरे गावाच्या विकास कामांची माहिती देताना वंदना चव्हाण  म्हणाल्या, ‘ग्राम विकास योजनेअंतर्गत ग्रामस्वच्छता, पर्यावरणपूरक गाव यांचे महत्व लक्षात घेऊन अनेक प्रकल्पांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये चित्रकला स्पर्धा, आरोग्य शिक्षण व प्रौढ शिक्षण यांचा समावेश होता.
सायन्स टेक्नॉलॉजी विभाग, पुणे विद्यापीठ, यांनी जनरल इन्शुरन्स कंपनी मुंबईमार्फत स्वच्छ व शुद्ध पाणीपुरवठ्यासाठी आरो प्लाँट दिला आहे. यामार्फत गावाला स्वच्छ व सुंदर पाणी मिळत आहे त्यामुळे गावाच्या आरोग्यात सुधारणा झाली आहे.
तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांमधील गावापासून भंडारा डोंगरापर्यंत जाणारा रस्ता तसेच शालेय इमारत या गोष्टींची पूर्तता झालेली आहे. विकासकामात कोट्यवधी रुपयांची कामे करण्यात आली आहे.  या सर्वांचा मिळून लोकार्पण सोहळा संपन्न होतो आहे.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’च्यावतीने वासंतिक चंदन उटी सोहळ्याचे आयोजन

‘भारतीय वारकरी मंडळा’ची भजन सेवा पुणे– हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती...

महापालिकेतील कनिष्ठ अभियंत्याला 1 लाखाची लाच घेताना अटक

पुणे:पिंपरी महापालिकेत कनिष्ठ अभियंता म्हणून नोकरी करीत असलेल्यास...

“भारत गौरव ट्रेन – छत्रपती शिवाजी महाराज सर्किट” ९ जून पासून

पर्यटकांनी ऐतिहासिक़ पर्यटनाचा लाभ घ्यावा- पर्यटनमंत्री शंभूराज देसाईमुंबई, दि....