पुणे–वीरशिरोमणी महाराणा प्रताप यांची ४७७वी जयंती निमित्त पुण्यनगरीचे महापौर मुक्ता टिळक ह्यांच्या हस्ते महाराणा प्रताप उद्यानात वीरशिरोमणी महाराणा प्रताप यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. पुण्यात सर्व ठिकाणी जयंती उत्साहात साजरी करण्यात अली. या प्रसंगी पुणे राजपूत सभेचे अध्यक्ष सुरेश ठाकूर व असंख्या महाराणा प्रताप चाहते उपस्थित होते.