Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

प्रशासकीय कामकाजात गतिमानता वाढवून कामाचा दर्जा वाढवावा -विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी

Date:

पुणे दि. 26 : शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रशासकीय कामकाजात गतिमानता आणून कामाचा

दर्जा वाढवावा. प्रशासकीय कामकाज प्रभावी व्हावे व त्यामधे सुलभता यावी या उद्देशाने राजीव गांधी

प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धा राबविण्यात आली आहे,असे प्रतिपादन विभागीय आयुक्त

चंद्रकांत दळवी यांनी आज येथे केले.

राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान स्पर्धा-20016 च्या विजेत्यांना आज विधान

भवन सभागृहात आयोजित कार्यक्रमात विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांच्याहस्ते बक्षिस वितरण करण्यात

आले. बक्षिस वितरणानंतर अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी महसुल उपायुक्त सुधाकर

तेलंग, पुरवठा उपायुक्त निलीमा धायगुडे, लेखा व कोषागारे सहसंचालक शुभांगी माने, सोलापूरचे जिल्हा

कोषागार अधिकारी राहुल कदम, वरिष्ठ कोषागारे अधिकारी, पुणे संजय राजमाने, उपस्थित होते.

यावेळी बोलतांना विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी म्हणाले, नागरिकांना कार्यक्षम सेवा देण्याबरोबरच

कार्यालयांमध्ये झीरा पेंडंन्सी उपक्रम राबवाव. सध्याचे युग स्पर्धेचे आणि तंत्रज्ञानाचे आहे. त्यामुळे नवनवीन

तंत्रज्ञानाचा वापर करुन ई-गर्व्हनन्सवर लक्ष केंद्रीत करावे. स्पर्धेत विजयी झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी

इतर सहकाऱ्यांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी प्रेझेंटेशन देऊन स्पर्धेसंबधी मार्गदर्शन करावे अशी सूचनाही त्यांनी

केली.

लेखा व कोषागारे सहसंचालक शुभांगी माने यांनी, स्पर्धेत विजयी होण्यासाठी त्यांच्या सहकाऱ्यांनी

केलेल्या कार्याची माहिती दिली. सोलापूरचे जिल्हा कोषागार अधिकारी श्री.कदम यांनी, लेखा व कोषागारे

विभागाने तंत्रज्ञान वापरुन केलेल्या सुधारणांचे अनुकरण करावे, असे सांगितले. लेखा व कोषागार विभागाने

त्यांचे कामकाज ऑनलाईन केल्याबद्दल सविस्तर माहिती यावेळी त्यांनी दिली.

या स्पर्धेअंतर्गत सहसंचालक, लेखा व कोषागारे,पुणे यांना प्रथम पारितोषिकासाठी रुपये एक लाखाचा

धनादेश व जिल्हा कोषागार अधिकारी, सोलापूर यांना व्दितिय क्रमांकासाठी रुपये सत्तर हजाराचा धनादेश

विभागीय आयुक्त्‍ चंद्रकांत दळवी यांच्याहस्ते वितरीत करण्यात आला. या पारितोषिकाची रक्कम, कोषागार

कार्यालयाचा प्रशिक्षण हॉल सुसज्ज करण्यासाठी वापरण्यात येणार असल्याचे, लेखा व कोषागार विभागाच्या

सहसंचालक शुभांगी माने यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अपर्णा देशपांडे यांनी केले. या कार्यक्रमास विभागीय आयुक्त कार्यालय,

जिल्हाधिकारी कार्यालय व लेखा व कोषागार कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी मोठया प्रमाणावर उपस्थित

होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

साळुंखे, पवार यांनी महाराष्ट्राचा वास्तव इतिहास समोर आणला

मुळशी खोरे स्वराज्य आणि स्वातंत्र्यासाठी लढणारी प्रेरणाभूमी-ज्येष्ठ नेते शरद...

भाजपच्या ओमकार कदम आणि सहकाऱ्यांवर अखेर पोलिसात गुन्हा दाखल

पुणे -महापालिकेच्या आरोग्य विभागातील एका महिला अधिकाऱ्याला मानसिक त्रास...

एक्सप्रेसवेवर पोलिसांच्या ताफ्याचा मोठा अपघात:सहा ते सात वाहने एकमेकांना धडकली

पुणे- मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील भातान बोगद्याजवळ मंगळवारी सकाळी एक मोठा...