पुणे: महिला आर्थीकदृष्ट्या सक्षम झाल्यास कुटुंब सक्षम होईल हे लक्षात घेऊन महिला बचत गटांना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन पालकमंत्री गिरीश बापट यांनी आज येथे केले.
विभागीय आयुक्त कार्यालय, जिल्हा परिषद व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा पुणे यांच्या संयुक्त विदयमाने आयोजीत गणेश कला क्रीडा मंच येथे पालकमंत्री गिरीश बापट “दख्खन जत्रा 2017” या विक्री व प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
इमारत बांधणे सोपे आहे पण संसार उभा करणे खुप कठीण आहे, असे सांगून पालकमंत्री बापट पुढे म्हणाले कि, महिला मुळातच कुटुंबाला आर्थीक स्थैर्य निर्माण करुन देण्यासाठी सतत काम करत असतात. या प्रदर्शनात उपलब्ध महिला बचत गटा द्वारे उत्पादित वस्तूंची खरेदी करुन महिलांना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन केले.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई, उपायुक्त चंद्रकांत गुडेवार, जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक दिनेश डोके तसेच विस्तार अधिकारी, तालुका समन्वयक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हे विक्री व प्रदर्शन सोमवार दि.27 ते दि.31 मार्च 2017 या दरम्यान गणेश कला क्रिडा, केंद्र स्वारगेट येथे आयोजित करण्यात आले असून या मध्ये पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापुर या पाच जिल्ह्यातील स्वयंसहाय्यता समुह सहभागी झाले असून एकुण 180 स्टॉलची उभारणी करण्यात आली आहे.त्यामध्ये विविध वस्तू व उत्पादनांचे 130 तर खाद्यपदार्थांचे 50 स्टॉल लावण्यात आले आहेत.