राज्याचा अर्थसंकल्प कृषीक्षेत्राच्या विकासाला बळकटी देणारा -ज्येष्ठ संपादक यमाजी मालकर

Date:

पुणे दि. २३ : देशाच्या एकूण उत्पन्नात महाराष्ट्राचा मोठा वाटा आहे, त्यामुळे महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पाकडे संपूर्ण देशाचे लक्ष असते. यावर्षीचा महाराष्ट्राचा अर्थसंकल्प संतुलीत असून कृषीक्षेत्राच्या विकासाला बळकटी देणारा असल्याचे प्रतिपादन अर्थक्रांती प्रतिष्ठानचे विश्वस्त, ज्येष्ठ संपादक यमाजी मालकर यांनी आज केले.

विभागीय माहिती कार्यालय, पुणे आणि जिल्हा माहिती कार्यालय, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने येथील सहकार आयुक्तालयाच्या सभागृहात आयोजित “अर्थसंकल्पाचा अन्वयार्थ” या विषयावरील व्याख्यानात प्रमुख वक्ते म्हणून श्री. मालकर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागाचे प्रमुख संजय तांबट होते. यावेळी दैनिक पुढारीचे कार्यकारी संपादक अल्हाद गोडबोले,  विजय कोलते, उपसंचालक (माहिती) मोहन राठोड, प्र. जिल्हा माहिती अधिकारी वृषाली पाटील उपस्थित होत्या.

श्री. यमाजी मालकर म्हणाले, देशाच्या एकूण उत्पन्नात महाराष्ट्राचा मोठा वाटा असल्याने राज्याच्या अर्थसंकल्पाला मोठे महत्व आहे. यावर्षीचा अर्थसंकल्प हा सर्व क्षेत्रांना सामावून घेणारा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पात फारसे कर लावण्यात आलेले नाहीत. त्याच बरोबर शेतीशी निगडीत कर मागे घेण्यात आलेले आहेत. राज्यावर जरी ३ लाख १७ हजार कोटींचे कर्ज असले तरी राज्याचे सकल उत्पन्न १७ लाख कोटींपेक्षा जास्त असल्याने राज्य कर्जफेड करण्यास सक्षम आहे. यावर्षीच्या अर्थसंकल्पावर जीएसटीचा प्रभाव आहे. यामुळे गुंतागुंतीची करप्रणाली सोपी होण्यास मदत होणार असून जीएसटीच्या अंमलबजावणीमुळे अधिकचे कर मिटविण्याची प्रक्रीया सुरु होणार आहे.

यावर्षीच्या अर्थसंकल्पात शेती व शेतीशी निगडीत क्षेत्रात भरीव तरतुदी करण्यात आल्या आहेत. त्याचे चांगले परिणाम नजीकच्या काळात आपणला नक्कीच पहायला मिळणार आहेत. या अर्थसंकल्पात जलयुक्त शिवार अभियानासाठी १२०० कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे. जलयुक्त शिवार अभियान ही राज्य सरकारची महत्वकांक्षी योजना आहे. गत वर्षी या योजनेमुळे राज्यातील ४ हजार ३७४ गावे टंचाईमुक्त झाली आहेत. त्याच बरोबर सरकारने यावर्षी ऊस खरेदीवरील कर माफ केल्यामुळे साखर कारखान्यांना ७०० कोटीचा अतिरिक्त निधी उपलब्ध झाला आहे, याचा फायदा थेट शेतकऱ्यांच्या ऊसाला चांगला दर देताना होणार आहे. त्याचबरोबर संरक्षीत सिंचनव्यवस्था बळकट करण्यासाठी शेततळ्यासाठी लागणाऱ्या पॉलीथिन शीटवरील कर सरकाने कमी केला आहे. त्यामुळे शेततळ्यांची संख्या वाढण्यास मदत होणार आहे. त्याच बरोबर या अर्थसंकल्पात सरकारने माती परिक्षण किटवरील कर कमी केला आहे. त्यामुळे कमी किंमतीत माती परीक्षण करुन घेणे शक्य होणार आहे. गटशेतीला चालना देण्यासाठी २०० कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. एकूणच शेती व शेतीशी निगडीत असणाऱ्या क्षेत्रात या अर्थसंकल्पात भरीव तरतुदी करण्यात आल्या आहेत. त्याचे चांगले परिणाम नजीकच्या काळात दिसणार आहेत.

लोकसंख्येचा विचार करता महाराष्ट्र हे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे. राज्यातील लोकसंख्येची घनता ३८२ प्रती चौरस किलोमीटर एवढी आहे. त्यामुळे सहाजिकच नैसर्गिक संसाधनाच्या वाटपावर याचा विपरीत परिणाम होत असतो. राज्यातील कृषी संलग्न क्षेत्राच्या विकासाचा दर चांगला आहे. येत्या काही दिवसात तो १२.५ टक्के एवढा होणार आहे. राज्यातील उत्पन्नात सेवा क्षेत्राचा मोठा वाटा आहे, त्या खालोखाल उद्योग व त्याखाली कृषी क्षेत्राचा वाटा आहे. त्यामुळे यापुढे सेवा क्षेत्राला अधिक चांगले दिवस येणार असल्याचे श्री. मालकर यांनी सांगितले.

श्री. संजय तांबट म्हणाले, राज्याचा यावर्षीचा अर्थसंकल्प हा सर्वसमावेशक आहे. या अर्थसंकल्पात सर्व क्षेत्रात तरतुदी करण्यात आल्या आहेत. श्री. मालकर यांनी अत्यंत सोप्या भाषेत अर्थसंकल्पाचे केलेले विवेचन अत्यंत उपयुक्त असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रास्ताविकात श्री. मोहन राठोड म्हणाले, राज्याचा अर्थसंकल्प हा अत्यंत क्लिस्ट विषय असल्याने या अर्थसंकल्पाचे आकलन सामान्य लोकांना होत नाही. सरकारच्या विविध योजना आणि अर्थसंकल्पातील तरतुदीची माहिती सर्वसामान्यांना समजाव्यात यासाठी “अर्थसंकल्पाचा अन्वयार्थ” या व्याख्यानाचे आयोजन माहिती व जनसंपर्क विभागाच्यावतीने करण्यात आले होते.

व्याख्यानानंतर उपस्थितांनी मान्यवरांना अर्थसंकल्पाविषयी प्रश्न विचारले. या प्रश्नांची समर्पक उत्तरे श्री. मालकर यांनी दिली. आभार वृषाली पाटील यांनी मानले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या डेक्कन येथील स्मारकाचे नूतनीकरण भूमिपूजन समारंभ संपन्न. !

पुणे - पुण्यातील डेक्कन जिमखाना येथील भव्य अश्या धर्मवीर छत्रपती...

स्वारगेट – कात्रज बीआरटी मार्गावरील मेट्रो कामामुळे पीएमपीएमएल बससेवेत तात्पुरते बदल

पुणे - पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. ने प्रसिद्धीसाठी दिलेल्या...

‘गोदरेज’कडून ‘फोर्कलिफ्ट’ साठी भारतातील पहिले मल्टीआयन बॅटरी तंत्रज्ञान सादर

उत्पादन आणि वेअरहाउसिंग क्षेत्रातील पुरवठा साखळीसाठी स्वच्छ, कार्यक्षम आणि शाश्वत ऊर्जा उपायांचा नवा मापदंड निर्माण करण्याचा प्रयत्न मुंबई, १४ मे २०२६ : भारतातील मटेरियल हँडलिंग क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांपैकी एक असलेल्या ‘गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुप’ने (जीईजी) आपल्या मटेरियल हँडलिंग इक्विपमेंट (एमएचई) व्यवसायाअंतर्गत ‘इलेक्ट्रिक फोर्कलिफ्ट’साठी भारतातील पहिले मल्टी आयन बॅटरी तंत्रज्ञान सादर केले आहे. भारतामध्ये उत्पादन, लॉजिस्टिक्स आणि वेअरहाउसिंग या क्षेत्रांचा वेगाने विस्तार होत असताना अधिक कार्यक्षम, विश्वासार्ह आणि शाश्वत ऊर्जा उपायांची गरज वाढत आहे. ही गरज लक्षात घेऊन हे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. या बॅटरीमुळे मालकीचा एकूण खर्च २५ टक्क्यांपर्यंत कमी होण्यास, उपकरणांचा कार्यरत कालावधी वाढण्यास आणि औद्योगिक कामकाज अधिक स्वच्छ व पर्यावरणपूरक होण्यास मदत होणार आहे. तसेच ही बॅटरी फोर्कलिफ्टच्या संपूर्ण कार्यकालापर्यंत टिकेल, अशा पद्धतीने तयार करण्यात आली आहे. भारतात औद्योगिक आणि वेअरहाउसिंग यांचा बाजार वेगाने वाढत आहे. २०२६-२७ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देशातील प्रमुख आठ शहरांमध्ये १.१ कोटी चौरस फुटांहून अधिक जागेचे लीजिंग झाले आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यात दुहेरी अंकातील वाढ नोंदवली गेली आहे. थर्ड पार्टी लॉजिस्टिक्स (थ्री-पीएल), ई-कॉमर्स आणि उत्पादन या क्षेत्रांमुळे पुरवठा साखळीच्या आधुनिकीकरणाला मिळालेली चालना हे यामागचे प्रमुख कारण आहे. गोदामांची संख्या आणि त्यांच्या कामकाजाचा वेग वाढत असताना, ऊर्जा कार्यक्षम, सुरक्षित आणि भविष्यासाठी तयार असलेल्या मटेरियल हँडलिंग उपायांची गरज आता उत्पादकता आणि कार्यक्षमतेसाठी अत्यंत महत्त्वाची बनली आहे. ‘मल्टी आयन बॅटरी’मध्ये जलद आणि ऑपर्च्युनिटी (कामाच्या मधल्या वेळेत) चार्जिंग, शून्य देखभाल खर्च आणि ऊर्जेची उच्च कार्यक्षमता यांसारख्या सुविधा एकत्रितपणे देण्यात आल्या आहेत. तसेच, यामध्ये दुर्मिळ धातूंवरील अवलंबित्व कमी करण्यात आले असून बॅटरीच्या विल्हेवाटीशी संबंधित अडचणीही कमी होतील, याची काळजी घेण्यात आली आहे. भारतामधील आघाडीच्या ‘डीप-टेक बॅटरी इनोव्हेटर्स’पैकी एका कंपनीच्या सहकार्याने विकसित करण्यात आलेले हे तंत्रज्ञान तब्बल ५,००० लाईफ सायकल्स देते. हे प्रमाण सामान्य लिथियम-आयन बॅटरींपेक्षा जवळपास ६० टक्के अधिक आहे. त्यामुळे उपकरणाच्या संपूर्ण कार्यकाळासाठी हीच बॅटरी वापरता येते आणि खर्चही कमी होतो. ४५ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तपमानातही विश्वासार्हरीत्या कार्य करण्यासाठी ही मल्टी आयन बॅटरी तयार करण्यात आली आहे. त्यामुळे भारतातील उष्णकटिबंधीय हवामानासाठी ती विशेष उपयुक्त ठरते. ‘गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुप’च्या मटेरियल हँडलिंग इक्विपमेंट विभागाचे बिझनेस हेड अनिल लिंगायत म्हणाले, “भारतामधील पुरवठा साखळी अधिक व्यापक आणि गुंतागुंतीची होत आहे. अशा वेळी मटेरियल हँडलिंग क्षेत्राला विश्वासार्ह, दीर्घकालीन मूल्य देणारे आणि शाश्वत ऊर्जेचे उपाय आवश्यक आहेत. मल्टी आयन बॅटरी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आम्ही औद्योगिक उपकरणांना ऊर्जा देण्याची पद्धत अधिक आधुनिक आणि कार्यक्षम बनवत आहोत. प्रगत अभियांत्रिकीच्या मदतीने उपकरणे अधिक काळ कार्यरत राहणे, मालकीचा खर्च कमी होणे आणि एमएसएमईंसह संपूर्ण मूल्यसाखळीत अधिक स्वच्छ कामकाज करणे यांवर आमचा भर आहे. डिझाइन-आधारित नवकल्पना, संशोधन व विकास आणि तंत्रज्ञानाधारित उत्पादनांवर लक्ष केंद्रित करून लॉजिस्टिक्स क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर परिणाम घडवून आणण्याच्या आमच्या प्रयत्नांचे हे उदाहरण आहे.” मटेरियल हँडलिंग क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या ‘गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुप’च्या मते, अशा नव्या तंत्रज्ञानामुळे पुरवठा साखळी अधिक कार्यक्षम, वेअरहाउसिंग अधिक उत्पादक आणि औद्योगिक कामकाज अधिक स्थिर बनण्यास मदत होते. या नव्या उत्पादनाच्या लाँचमधून ‘गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुप’चा प्रगत अभियांत्रिकी आणि डिजिटल एकत्रीकरणावर असलेला भर दिसून येतो. ५,००० तासांहून अधिक प्रत्यक्ष वापरातील चाचण्यांच्या आधारे विकसित करण्यात आलेल्या या मल्टी आयन बॅटरी तंत्रज्ञानास ७ वर्षांची वॉरंटी देण्यात आली आहे. त्यामुळे ‘गोदरेज’च्या औद्योगिक उपायांवर ग्राहकांचा दीर्घकालीन विश्वास अधिक दृढ होणार असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.

चाकसमान धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी समाधान शिबिर आयोजित करावे; उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे निर्देश

"पुनर्वसन प्रक्रियेतील प्रलंबित प्रश्नांवर ठोस निर्णय घेण्यासाठी सर्व बैठकींचा...