Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

सकारात्मक बातम्यांना अधिक स्थान द्यायला हवे- सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी

Date:

पुणे :  बातमीचा समाजावर नकारात्मक परिणाम पडणार असेल तर अशा बातमीला किती स्थान द्यायचे व सकारात्मक बातम्यांना अधिक स्थान देता येईल का, हे पत्रकारांनी ठरवले पाहिजे, असे मत राज्याचे सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी आज येथे व्यक्त केले.

विभागीय आणि जिल्हा माहिती कार्यालय, पुणे तसेच पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पत्रकार कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी श्री.दळवी यांनी हे मत व्यक्त केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे, पुणे विभागाचे उपसंचालक (माहिती) मोहन राठोड, दैनिक पुढारीचे कार्यकारी संपादक आल्हाद गोडबोले, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागाचे विभागप्रमुख संजय तांबट, प्र.जिल्हा माहिती अधिकारी वृषाली पाटील, पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष गजेंद्र बडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी पुढे म्हणाले की, स्वर्गीय गोविंदराव तळवळकरांसारखे व्यासंगी पत्रकार आपले आदर्श असायला हवेत. पत्रकारितेच्या क्षेत्रातही प्रामाणिकपणाची, तत्वांची गरज आहे. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी श्री. दळवी यांना सहकार चळवळीच्या बाबतीत प्रश्न विचारले असता त्यांनी समर्पक उत्तरे दिली.

निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे म्हणाले की, आजचे युग माध्यमांनी व्यापले आहे. माध्यमांमुळे अनेक प्रश्न सुटण्यास मदत झाली आहे. प्रशासनालाही अनेक प्रश्नांवर योग्य तोडगा काढण्यासाठी माध्यमांचा उपयोग व दबाव असतो. कोणत्याही क्षेत्राप्रमाणेच माध्यम क्षेत्रामध्येही भारावून जाऊन काम केले पाहिजे, असेही ते म्हणाले.

आल्हाद गोडबोले म्हणाले की, पत्रकाराचे कुतूहल कायम जागे असले पाहिजे. बातमी आणि मते यातील सीमारेषा धूसर झालेली आजची पत्रकारिता आहे. बातमीमध्ये वैयक्तिक मते वाढली आहेत. वर्तमानपत्र हे विश्वासार्हतेच्या निकषावर चालते, ही बाब कायम लक्षात ठेवली पाहिजे. न पोहोचणारी माहिती मिळविण्यासाठी पत्रकारांनी प्रयत्न करायला पाहिजेत असेही ते म्हणाले.

उपसंचालक (माहिती) मोहन राठोड व प्र.जिल्हा माहिती अधिकारी वृषाली पाटील यांनी मान्यवरांना रोप व पुस्तक भेट देऊन स्वागत केले. कार्यक्रमाला प्रिंट व इलेक्ट्रॉनिक  माध्यमांचे  पत्रकार, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, गरवारे महाविद्यालय तसेच मराठवाडा मित्रमंडळ महाविद्यालयात पत्रकारितेचे शिक्षण घेत असलेले विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

वारकऱ्यांची निःस्वार्थ सेवा म्हणजे पांडुरंगाचा प्रसाद:उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची भावना

वारकऱ्यांसाठी फिरता दवाखाना उपक्रमाचा शुभारंभ 'सिंबायोसिस' व सौ. शीला राज...

पुण्यात पाऊस सुरूच… मुठेत आता 15 हजाराचा विसर्ग

पुणे: शहर आणि परिसरात गेल्या दोन दिवसांपासून संततधार पाऊस...

“स्त्रियांच्या गरजा समजून घेतल्याशिवाय सेवा अपूर्ण”- उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचा ‘आरोग्यवारी’ उपक्रमात विशेष सहभाग

वारीतील महिला सुरक्षेसाठी प्रशासन सज्ज; ‘आरोग्यवारी’ उपक्रमातून व्यापक व्यवस्था पुणे,...