Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

जिल्हाधिकारी कार्यालय आयोजित महिला आरोग्य शिबिराचे उदघाटन संपन्न

Date:

पुणे दि.22: जागतिक महिला दिनानिमित्त महिलांच्या आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन विधान भवन सभागृहात करण्यात आले होते. या शिबिराचे उदघाटन विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम यांच्या हस्ते झाले.
अधिकाधिक महिला कर्मचार्यांनी शिबिराचा लाभ घ्यावा व आपल्या आरोग्याबाबत जागरूक रहावे असे आवाहन विभागीय आयुक्त चोक्कलिंगम यांनी यावेळी केले.
या शिबिरात विभागीय कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व महिला कर्मचाऱ्यांची तपासणी जहागीर हॉस्पिटल यांच्या सौजन्याने 22 ते 30 मार्च 2017 दरम्यान करण्यात येणार आहे. यासाठी महिला कर्मचाऱ्यांना त्यांच्या सोईनुसार वेळ देण्यात येणार आहे अशी माहिती जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी यावेळी दिली.
आजच्या धकाधकीच्या आयुष्यात कॅन्सरसारख्या दुर्धर आजारांचे प्रमाण बळावत चालले आहे. या आजाराचे वेळीच निदान झाले तर,त्यावर आपण सहज मात करू शकतो,त्यासाठी आवश्यक ते सर्व उपचार उपलब्ध आहेत असे प्रतिपादन जहांगीर हॉस्पिटलचे संचालक सरकवासजी जहांगीर यांनी केले.

या कार्यक्रमास ,सामान्य प्रशासन उप आयुक्त कविता द्विवेदी, पुरवठा उप आयुक्त निलिमा धायगुडे,निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे,उपजिल्हाधिकारी मोनिका सिंग तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व महिला व कर्मचारी उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी- ॲड. अनुरुद्र चव्हाण यांची निवड

पुणे : महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या अर्थात कर सल्लागार...

पर्यावरणाच्या रक्षणासाठी वसुंधरा फाऊंडेशनचे कार्य गौरवास्पद : ममता सिंधूताई सपकाळ

पुणे : एखाद्या संस्थेच्या माध्यमातून जेव्हा एक भावना, दिशा...

अब्दुल कलाम ई-लर्निंग स्कुल मुलांच्या किलबिलाटाने गजबजले

पुणे- आज महाराष्ट्र राज्यातील बहुतांश आणि पूणे मनपाच्या सर्व...