Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

लव्ह लग्न लोचाची टीम होणार बेघर !!!

Date:

लव्ह लग्न लोचा …ज्या मालिकेच्या नावातच लोचा आहे , तिथे लोचे होणे हि काही नवीन गोष्ट नाही . मैत्रीचं प्रेम , लग्नातील मज्जा आणि या सगळ्यांतून होणारे लोचे हे आज प्रत्येकाच्या आयुष्यातील एक भाग आहे . झी युवावच्या या फ्रेश मालिकेला प्रेक्षक उत्तम प्रतिसाद देत आहेत . या मालिकेने बच्चे पार्टीपासून वृद्धांपर्यंत प्रत्येकाला आपलेसे केलं आहे .  मैत्रीचे वेगेवेगळे रंग दाखवणारी ही मालिका सध्या महाराष्ट्रातील प्रत्येक शहरात आणि गावात आवडीने पहिली जात आहे .यातील राघव , सौम्या , अभिमान , सुमीत , विनय , काव्या , आकांशा आणि खळखळून हसणारी शाल्मली ही मित्रमंडळी आज सगळ्यांची आपली झाली आहेत . आज मैत्रीच्या मालिकांमध्ये लव्ह लग्न लोचा उच्चांग गाठत आहे . पण या मालिकेमध्ये एक मोठा लोचा होणार आहे . याच टीम ला आता बेघर व्हावे लागणार आहे . म्हणजे विनय राघव आणि सुमीत ला . त्याच काय झालंय विनय राघव आणि सुमीत हे गेली अनेक वर्षे माने कुटुंबियांच्या फ्लॅट मध्ये पेइंग गेस्ट म्हणून राहतात हे आपल्याला माहीतच आहे . माने कुटुंब सुद्धा त्यांना अगदी मुलासारखे सांभाळतात प्रेम करतात . पण हेच माने कुटुंबियांच्या खऱ्या मुलाला खुपसले . एक तर तो अनेक वर्षे अमेरिकेत होता . स्वभावानेच अहंकारी , तिरकस असलेला श्रीकांत  म्हणजेच आपला समीर खांडेकर . आता श्रीकांत तिरस्काराने पेटला आहे . त्यामुळे माने काकूंना तो पटवून देणार आहे कि हि आपली विनय , सुमीत आणि राघव ची गॅंग कशी चुकीची आहे आणि त्यांना तो  घराबाहेर काढणार आहे . पण त्यानंतर काय ? श्रीकांत खरंच असे करू शकेल ? आपले विनय , सुमीत राघव कुठे जाणार ? गुड च्या विरुद्ध बॅड एकमेकांच्या समोर काय टिकणार ?  या लोच्याच नक्की काय होते हे पाहण्यासाठी पहात राहा “लव्ह लग्न लोचा “झी युवावर सोमवार ते शनिवार रात्री ८:३० वाजता .

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी- ॲड. अनुरुद्र चव्हाण यांची निवड

पुणे : महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या अर्थात कर सल्लागार...

पर्यावरणाच्या रक्षणासाठी वसुंधरा फाऊंडेशनचे कार्य गौरवास्पद : ममता सिंधूताई सपकाळ

पुणे : एखाद्या संस्थेच्या माध्यमातून जेव्हा एक भावना, दिशा...

अब्दुल कलाम ई-लर्निंग स्कुल मुलांच्या किलबिलाटाने गजबजले

पुणे- आज महाराष्ट्र राज्यातील बहुतांश आणि पूणे मनपाच्या सर्व...