Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

‘सूर्यदत्ता’तर्फे पुण्यातील ३०० गरजू महिलांना फॅशन डिझाईनचे मोफत प्रशिक्षण

Date:

पुणे : सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स’ आणि भारतीय जनता पक्षातर्फे महिला सक्षमीकरणाच्या हेतूने ३०० गरजू महिलांना फॅशन डिझाईनचे प्रशिक्षण नुकतेच देण्यात आले. गेले दोन महिने सुरु असलेल्या या प्रशिक्षणात सहभागी झालेल्या महिलांना कोथरुड डेपोजवळ भुसारी कॉलनीतील शुभेच्छा मंगल कार्यालयात आज दुपारी झालेल्या कार्यक्रमात प्रमाणपत्रे देण्यात आली. या महिलांनी बनवलेल्या कपड्यांचे प्रदर्शन आणि फॅशन शोचे आयोजनही यावेळी करण्यात आले.

 

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध मराठी चित्रपट दिग्दर्शक प्रवीण तावडे, तसेच या उपक्रमासाठी पुढाकार घेणारे ‘सूर्यदत्ता’चे अध्यक्ष डॉ. संजय चोरडिया, सिद्धार्थ चोरडिया आणि भारतीय जनता पक्षाचे नगर सेवक गणेश दगडे, ‘सूर्यदत्ता’च्या फॅशन डिझायनिंग विभागप्रमुख सौ. रेणुका घोसपूरकर, महिलांना ‘सर्टिफिकेट शॉर्ट कोर्स इन फॅशन डिझायनिंग’चे प्रशिक्षण देणाऱ्या ‘सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट’च्या प्रा. सौ. कल्पना सूर्यवंशी, सौ. स्वरदा भगत आणि त्यांचे सहकारी उपस्थित होते.

 

यावेळी गणेश दगडे म्हणाले, की महिलांनी स्वावलंबी व आर्थिक सक्षम होऊन आपल्या कुटूंबाच्या निर्वाहास, तसेच प्रगतीस हातभार लावावा, या हेतूने आम्ही हा प्रशिक्षण उपक्रम राबवत आलो आहोत. यापुढेही आम्ही हे कार्य सुरुच ठेऊ.

 

डॉ. संजय चोरडिया यांनीही या प्रतिपादनाला दुजोरा दिला. ते म्हणाले, की प्रशिक्षणाचा एकमेव हेतू महिला सक्षमीकरण आहे. महिलांनी केवळ चूल व मूल या चौकटीत अडकून न राहाता अशा विविध प्रशिक्षणांचा लाभ घेऊन आर्थिकदृष्ट्या सबल व्हावे आणि वाढत्या महागाईचा विचार करता केवळ प्रशिक्षणावरच न थांबता त्या क्षेत्रात व्यवसाय सुरु करावा. स्वतःचे बुटीक उघडून ऑनलाईन विक्री व विपणनाद्वारे हा व्यवसाय वाढवत न्यावा. सूर्यदत्ताने गेल्या ७ वर्षांपासून विविध कौशल्यांचे प्रशिक्षण देणारे वर्ग आयोजित केले असून आजवर ३००० हून अधिक महिलांना यशस्वीपणे प्रशिक्षीत केले आहे. आम्हीही हे कार्य पुढे चालवत राहू.

 

ते पुढे म्हणाले, की दोन महिने कालावधीच्या या प्रशिक्षणात महिलांना बेबी फ्रॉक, सलवार कुर्ती, ब्लाऊज, वन पीस, भरतकाम व मेन्स वेअर, ऑनलाईन मार्केटिंग, मार्केट सर्व्हे, डिझायनिंग, फॅशन शो व प्रदर्शनाचे आयोजन असे व्यवसाय मार्गदर्शन केले जाते. अन्यत्र या प्रशिक्षणाचे शुल्क ४०००० ते ५०००० रुपयांपर्यंत आहे, परंतु आम्ही महिला सक्षमीकरणाच्या हेतूने कटिबद्ध राहून गरजू महिलांना ते मोफत देतो. त्यासाठी वयाची व शिक्षणाची कोणतीही अट नाही. अशिक्षीत महिलांनाही आम्ही यशस्वीरीत्या पारंगत केले आहे. महिला नोकरी, घरकाम, लहान मुले सांभाळून हे प्रशिक्षण घेतात. त्यामुळेच आम्हीही महिलांना सोईस्कर ठरेल अशी दुपारची वेळ या प्रशिक्षणासाठी निवडतो. या उपक्रमामुळे व्यवसायाबरोबरच समाजकार्य केल्याचे समाधानही ‘सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट’ला लाभत आहे.

 

हे प्रशिक्षण यशस्वी पूर्ण केलेल्या अंजली कार्डे मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या, की आतापर्यंत मी घेतलेल्या प्रशिक्षणांमध्ये हे प्रशिक्षण सर्वोत्तम होते आणि त्याबद्दल मी गणेश दगडे व डॉ. संजय चोरडिया यांचे विशेष आभार मानते. संस्थेने अल्पावधीत हे प्रशिक्षण दिले. सहा महिन्यांचा अभ्यासक्रम दोन महिन्यांच्या प्रशिक्षणात बसवला आणि आमच्याकडून पूर्ण करुन घेतला. केवळ प्रशिक्षणच नव्हे, तर व्यवसाय मार्गदर्शनही केले. आम्हाला ठाऊक नसलेल्या किती तरी संकल्पना शिकता आल्या. एखादा पॅटर्न तयार करताना त्यानुसार कापड कसे घ्यावे, रंगसंगती कशी साधावी एवढेच नव्हे तर व्यक्तीमत्व विकास कसा करावा, हेही मार्गदर्शन ‘सूर्यदत्ता’मधील शिक्षिकांनी आम्हाला केले. हा उपक्रम खरोखर महिलांना विकासाच्या दिशेने नेणारा असून मी त्याला शुभेच्छा देते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

व्याकरणाला भाषा विज्ञानाची जोड हवी : प्रा. यास्मिन शेख

शंभरी पार केलेल्या प्रा. यास्मिन शेख यांचा सुहृदांच्या उपस्थितीत...

“शेतकऱ्यांचे संरक्षण अत्यावश्यक, हिंगोलीत बोगस खत विक्री प्रकरणी तातडीने कारवाई करा”

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या कृषी विभागाला सूचना हिंगोली, दि....