Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

​डॉ.के.एच.संचेती यांना २०१७ चा ‘पुण्यभूषण पुरस्कार’

Date:

पुणे :
‘पुण्यभूषण फाऊंडेशन’(त्रिदल, पुणे) आणि पुणेकरांच्या वतीने दिला जाणारा ‘पुण्यभूषण पुरस्कार’ २०१७ डॉ.के.एच.संचेती यांना देण्यात येणार आहे. हा पुरस्कार त्यांना वैद्यकीय क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी देण्यात येत आहे, अशी माहिती ‘पुण्यभूषण फाऊंडेशन’चे अध्यक्ष डॉ.सतीश देसाई यांनी पत्रकाद्वारे दिली.
​​

एक लाख रूपये रोख आणि बालशिवाजींची सोन्याच्या फाळाने पुण्याची भूमी नांगरित असलेली प्रतिमा, पुण्याच्या ग्राम देवतांसह असलेल्या या वैशिष्ठपूर्ण स्मृतिचिन्हाने या वर्षीचे पुण्यभूषण पुरस्कार्थी डॉ.के.एच.संचेती यांना गौरविण्यात येणार आहे. हा पुरस्कार पद्मविभूषण डॉ.रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने देण्याचे ठरविले आहे. जुलै महिन्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

पुरस्काराचे यंदाचे २९ वे वर्ष आहे. या पुरस्काराबरोबर पाच ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिकांनाही गौरविण्यात येणार आहे. यामध्ये वसंत दत्तात्रय प्रसादे, मधुकर ताम्हसकर, निर बहादूर गुुरुंग, गोविंद बिरादार, अनिल लामखाडे यांचा समावेश आहे.
​​

या आधी ‘पुण्यभूषण पुरस्कार’ ज्येष्ठ गायक कै.पं.भीमसेन जोशी, राजा दिनकर केळकर संग्रहालयाचे कै.काका केळकर, कै.शंतनुराव किर्लोस्कर, कै.डॉ.बानुबाई कोयाजी, सुप्रसिद्ध साहित्यिक कै.पु.ल.देशपांडे, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, योगाचार्य बी.के.अय्यंगार, कै.डॉ.रा.ना.दांडेकर, डॉ. मोहन धारिया, डॉ.जयंत नारळीकर, कै.प्रतापराव गोडसे, ज्येष्ठ क्रिकेटपटू चंदू बोर्डे, कै.जयंतराव टिळक, डॉ.जब्बार पटेल, राहुल बजाज, कै.डॉ.के.बी.ग्रँट, विख्यात नृत्यसाधिका कै.डॉ.रोहिणी भाटे, डॉ.बाबा आढाव, ज्येष्ठ अभिनेते डॉ.श्रीराम लागू, शास्त्रज्ञ डॉ.रघुनाथ माशेलकर, डॉ.शां.ब.मुजुमदार, डॉ.रा.चिं.ढेरे, डॉ.ह.वि.सरदेसाई, निर्मला पुरंदरे, सुधीर गाडगीळ, डॉ.सायरस पूनावाला, प्रतापराव पवार आणि श्री.भाई वैद्य या मान्यवरांना प्रदान करण्यात आले होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

व्याकरणाला भाषा विज्ञानाची जोड हवी : प्रा. यास्मिन शेख

शंभरी पार केलेल्या प्रा. यास्मिन शेख यांचा सुहृदांच्या उपस्थितीत...

“शेतकऱ्यांचे संरक्षण अत्यावश्यक, हिंगोलीत बोगस खत विक्री प्रकरणी तातडीने कारवाई करा”

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या कृषी विभागाला सूचना हिंगोली, दि....