Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

मुद्रा बँक योजनेतून कर्ज घ्या आणि यशस्वी उद्योजक बना!

Date:

पुणे : मुद्रा बँक योजनेच्या लाभासाठी इच्छुक लाभार्थ्यांनी नजीकच्या बँकेशी किंवा ज्या बँकेमध्ये आपले खाते आहे, त्या बँकेशी संपर्क करुन मुद्रा बँक योजनेतून कर्ज घ्यावे आणि यशस्वी उद्योजक बनावे, असे आवाहन अतिरिक्त जिल्हाधिकारी रमेश काळे यांनी आज येथे केले.

मुद्रा बँक योनजेच्या प्रसारासाठी जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने चित्ररथ तयार करण्यात आला आहे. या चित्रारथाला झेंडा दाखवून अतिरिक्त जिल्हाधिकारी रमेश काळे यांनी मार्गस्थ्‍ा केले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार दत्तात्रय भरणे, माहिती उपसंचालक मोहन राठोड, प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी वृषाली पाटील, अग्रणी बँकेचे जिल्हा वित्तीय साक्षरता अधिकारी पी.एस.सरडे, नोडल ऑफीसर श्रीमती तनुजा उरणकर उपस्थित होते.

यावेळी बोलताना श्री.काळे म्हणाले की, विना जामिनदार ‘मुद्रा’ योजनेद्वारे  व्यावसायीकांना कर्ज उपलब्ध होणार आहे.  कर्जासाठी  जामिन होणं आणि जामिनदार मिळवणं ही अतिशय अवघड गोष्ट आहे. मुद्रा बँक योजनेमुळे ही अवघड गोष्टच निकाली निघाली आहे. विना जामिनदार कर्ज योजनेमुळे व्यावसायिकांना अतिशय फायदा होत असल्याचेही ते म्हणाले. राज्यात पुणे जिल्हयात सर्वात जास्त मुद्रा बँक योजनेमध्ये कर्ज वितरण करण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

या चित्ररथाद्वारे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील निवडक गावांमधून मुद्रा बँक योजनेची प्रचार व प्रसिद्धी करण्यात येणार आहे.

यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील तसेच जिल्हा माहिती कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी मोठया प्रमाणावर उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

व्याकरणाला भाषा विज्ञानाची जोड हवी : प्रा. यास्मिन शेख

शंभरी पार केलेल्या प्रा. यास्मिन शेख यांचा सुहृदांच्या उपस्थितीत...

“शेतकऱ्यांचे संरक्षण अत्यावश्यक, हिंगोलीत बोगस खत विक्री प्रकरणी तातडीने कारवाई करा”

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या कृषी विभागाला सूचना हिंगोली, दि....