Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

7 ते 22 एप्रिल 2017 दरम्यान अहमदनगर येथे सैन्य भरती

Date:

पुणे: सेना भरती मुख्यालय,पुणे यांच्यातर्फे पुणे,अहमदनगर,लातूर, उस्मानाबाद आणि बीड येथील पात्र उमेदवारांसाठी 7 ते 22 एप्रिल 2017 दरम्यान पोलीस परेड ग्राऊंड,अहमदनगर येथे ऑनलाईन अर्जाद्वारे सैन्य भरती करण्यात येणार आहे. यामध्ये सोल्जर जनरल डयुटी,सोल्जर क्लार्क,स्टोअर किपर,टेक्नीकल सोल्जर,टेक्नीकल सोल्जर ट्रेडसमन या पदांसाठी भरती होणार आहे. उमेदवारांनी www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर अर्ज भरावे व ॲडमीट कार्ड प्राप्त करावे. भरती स्थळावर भरती रॅलीमध्ये फक्त ॲडमिट कार्ड असलेल्या उमेदवारांना प्रवेश दिला जाईल. ॲडमिट कार्ड उमेदवारांच्या ई-मेल आयडीवर पाठविले जातील. उमेदवारांने त्यांच्या ॲडमिट कार्डवर नमुद केलेल्या दिवशी व वेळी रॅली स्थळ, पोलीस परेड ग्राऊंड, अहमदनगर येथे ॲडमिट कार्डच्या प्रिंट सहित हजर रहावे. नमुद तारखेशिवाय उमेदवार उपस्थित राहिल्यास त्याला प्रवेश दिला जाणार नाही.

रॅली दिवशी ॲडमिट कार्ड आणणे आवश्यक आहे. उमेदवारानी भरतीसाठी येताना पुढील मुळ कागदपत्रांसह दोन झेरॉक्स प्रती सोबत आणाव्यात. 10 वी चे प्रमाणपत्र,पदवी,डिप्लोमा प्रमाणपत्र आणि गुणपत्रिका,शाळा सोडल्याचा दाखला,बोनाफाईड प्रमाणपत्र,राज्याच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी सांक्षांकित केलेला अधिवास आणि जातीचा दाखला, नगरसेवक, सरपंच आणि पोलीस पाटील यांचा दाखला, एन.सी.सी.,आय.टी.आय., खेळ, संगणक, पॉलिटेक्नीक किंवा कोणतेही स्किलचे प्रमाणपत्र, सध्याचा एकसारखा आकाराचा 16 पासपोर्ट साईज फोटो कॉपी, माजी सैनिकांनी त्यांच्या पाल्यासाठी अधिकृत बोर्ड ऑफिसचे डिस्चार्ज बुक व नाते सर्टिफिकेट देण आहे. ॲफिडेव्हीट/ प्रतिज्ञापत्राची ऑनलाईन नोंदणी 22 मार्च 2017 रोजी समाप्ती होणार आहे.

अधिक माहितीसाठी 020/26355005 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे,आवाहन सैन्य दलातर्फे करण्यात आले आहे.

0000000

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

चमत्कार! तो प्रवासी भयावह विमान अपघातातून वाचला…

अ हमदाबाद-लंडन विमानाचा आज भीषण अपघात झाला आहे. सुमारे...

अहमदाबाद विमान अपघातामुळे काँग्रेसचे मतचोरी विरोधातील मशाल मोर्चे १५ जून पर्यंत स्थगित

गडचिरोली/मुंबई दि १२ जून २५नरेंद्र मोदी हे ११ वर्षापासून...

बाळासाहेब दाभेकर यांच्या वाढदिवसा निमित्त सदानंद मोरे यांच्या हस्ते सत्कार अन रक्तदान शिबीर संपन्न.

पुणे (दि.१२) -सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब दाभेकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने...

जिल्हा परिषदेच्या ‘पुणे मॉडेल स्कूल’ उपक्रमाचा १४ जून रोजी शुभारंभ

पुणे, दि. १२ : पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने शिक्षण...