ई-पीओएस मशिनद्वारे स्वस्त धान्य दूकानात अन्नधान्याचे वाटप

Date:

पुणे : अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागातर्फे 1 जानेवारी पासून राज्यामध्ये धान्य वितरणासाठी ई-पिओएस प्रणाली सुरु करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गंत सर्व स्वस्त धान्य दुकानदारांना ई-पीओएस मशिन देण्यात येणार आहे. या योजनेतंर्गत पुणे शहरासाठी दोन बायोमेट्रिक ई-पीओएस मशिन देण्यात आल्या होत्या. सार्थक महिला बचत गट व सत्यज्योती सावित्रीबाई फुले महिला बचत गट या दोन स्वस्त धान्य दूकानांना या ई-पीओएस मशीन पुरविण्यात येऊन ई-पिओएसद्वारे धान्य वितरण करण्यासाठी इंटरनेट जोडणी देण्यात आली होती.

अन्नधान्य वितरण अधिकारी शहाजी पवार, सहाय्यक अन्नधान्य वितरण अधिकारी रणजित देसाई, सहाय्यक अन्नधान्य वितरण अधिकारी शांताराम सांगडे, ब विभागाचे परिमंडळ अधिकारी दांडगे, लाभार्थी व परिसरातील नागरिक यांच्या उपस्थितीत सदरील स्वस्त धान्य दुकानांमधुन ई-पिओएस प्रणालीद्वारे ई-पीओएस मशीनचा वापर करुन एकुण दहा लाभार्थ्यांना गहू व तांदूळाचे वाटप यशस्वीरित्या करण्यात आले. हे धान्य वाटप कॅशलेस पध्तीने करण्यात आले आहे. सदरची ई-पिओएस प्रणाली जिल्हाधिकारी  सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यान्वित करण्यात आली असून या व्यवहारांची माहिती http://dhaanyapurti.nic.in/FpsSales/MH या संकेत स्थळावर उपलब्ध आहे असे अन्न धान्य वितरण अधिकारी शहाजी पवार यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

उबरचा भारतात मोठा विस्तार; आणखी १०० शहरांमध्ये ‘Uber Bike’ सेवा

देशभरातील उपस्थिती २२० हून अधिक शहरांमध्ये; स्वातंत्र्यदिनानिमित्त नवीन रायडर्सना...

मर्सिडीज-बेंझचा भारतातील पहिला AI-आधारित ऑटोमेटेड ‘ व्हेईकल स्कॅनर’ मुंबईत सुरू

जोगेश्वरीतील ‘लँडमार्क कार्स’मध्ये मुंबईतील सर्वात मोठे लक्झरी सर्व्हिस सेंटर;...

मानसी नाईक यांना नृत्य वैभव पुरस्कार प्रदान 

पुणे : धावपळीच्या जीवनात प्रत्येकजण आपल्या ध्येयामागे धावत असतो; मात्र...

गोठ्यातील पारंपरिक पशुपालनापासून प्रयोगशाळेतील भ्रूणनिर्मितीपर्यंत

महाराष्ट्राच्या दुग्धव्यवसायाची नवी श्वेतक्रांती हजारो वर्षांपूर्वी मानवाने जंगलातील प्राण्यांना आपल्या...