पुणे : जेजूरी औद्योगिक क्षेत्र टप्पा क्रमांक ५ मधील अधिसूचीत केलेल्या नावळी गावातील जमिनीची राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज पाहणी केली. यावेळी जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे उपस्थित होते.
जेजूरी औद्योगिक क्षेत्र टप्पा क्रमांक ५ मध्ये २१ एप्रिल २०११ च्या अधिसूचनेनुसार प्रकरण ६ अन्वये २६३२.९५ हेक्टर क्षेत्र मावडी कडेपठार, नावळी व कोळविहिरे या गावातील अधिसूचित करण्यात आले. यापैकी बागायती क्षेत्र असल्याने मावडी कडेपठार येथील ९५६.०२ हेक्अर आर क्षेत्र वगळण्याचा प्रस्ताव दि. २० जुलै २०१६ शासनाला सादर करण्यात आला आहे. नावळी येथील अधिसूचीत जमिनीची पहाणी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केली. यावेळी त्यांनी एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांकडून या क्षेत्राविषयी माहिती घेतली. नावळी गावातील अधिसूचित करण्यात आलेल्या बाधीत शेतक-यांशी श्री. देसाई यांनी संवाद साधला.
यावेळी एमआयडीसीचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी रमेश सुरवाडे, विशेष कार्य अधिकारी प्रदीप ठाकरे, कार्यकारी अभियंता ए. के. आगवणे, एमआयडीसीचे विभागीय अधिकारी संतोषकुमार देशमुख, डेप्युटी इंजिनिअर आर. के. भोसले उपस्थित होते.