Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

जिल्हयातील गावे स्वयंपूर्ण होण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील-पालकमंत्री गिरीश बापट

Date:

पुणे– दौंड तालुक्यातील  आय.एस.ओ. मानांकन प्राप्त ग्रामपंचायत कुसेगाव येथील 5 कोटी 25 लक्ष रुपये खर्चाच्या विविध विकासकामांचे उदघाटन,भुमीपूजन व लोकार्पण सोहळा  पुणे जिल्हयाचे पालकमंत्री तथा अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते संपन्न झाला.

पालकमंत्री गिरीश बापट म्हणाले की, गावातील शाळा, शेतीसाठी पाण्याची उपलब्धता  तसेच तरुणांना व महिलांना गावात रोजगार उपलब्ध झाल्यास शहराकडे येणारे लोंढे थांबतील. यासाठी जास्तीत जास्त निधी शासनामार्फत उपलब्ध करुन  दिला जाईल असे आश्वासन दिले. अधिकारी व लोकप्रतिनीधी यांनी  सर्वांना बरोबर घेऊन  आणि समन्वयाने विकास कामे करावीत अशी सूचना  केली. रस्ते हे विकासाची गंगा आहे. रस्त्यांच्या विकासासाठी मुख्यमंत्री सडक योजने मार्फत जास्तीत जास्त निधी कुसेगावला उपलब्ध करुन देण्यात येईल. गावाचा विकास झाला तर देशाचा विकास होईल. पुणे जिल्हयातील सर्व गावे  स्वयंपूर्ण होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचेही  यावेळी ते म्हणाले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कुसेगावचे सरपंच मनोज फडतरे यांनी केले. मागील वर्षी दुष्काळ असताना   पालकमंत्र्यांनी कुसेगावला पिण्याचे पाणी उपलब्ध करुन दिले.त्याच प्रमाणे   कुसेगाव येथील रस्त्यांकडे पालकमंत्र्यांनी वैयक्तीक लक्ष देवून निधी उपलब्ध करुन द्यावा अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

कार्यक्रमास दौंडचे आमदार राहूल कूल, तहसिलदार विनोद साळुंके, गटविकास अधिकारी संतोष हराळे, जिल्हा परिषद सदस्या वैशाली  वाबळे,कार्यकारी अभियंता डी.एन.कुलकर्णी, पुणे जिल्हा मार्केट कमिटी चेअरमन दिलीप खैरे तसेच माजी आमदार रमेश आप्पा थोरात व कुसेगाव येथील ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

वारकऱ्यांची निःस्वार्थ सेवा म्हणजे पांडुरंगाचा प्रसाद:उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची भावना

वारकऱ्यांसाठी फिरता दवाखाना उपक्रमाचा शुभारंभ 'सिंबायोसिस' व सौ. शीला राज...

पुण्यात पाऊस सुरूच… मुठेत आता 15 हजाराचा विसर्ग

पुणे: शहर आणि परिसरात गेल्या दोन दिवसांपासून संततधार पाऊस...

“स्त्रियांच्या गरजा समजून घेतल्याशिवाय सेवा अपूर्ण”- उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचा ‘आरोग्यवारी’ उपक्रमात विशेष सहभाग

वारीतील महिला सुरक्षेसाठी प्रशासन सज्ज; ‘आरोग्यवारी’ उपक्रमातून व्यापक व्यवस्था पुणे,...