पुणे- महापालिकेच्या वतीने प्रथमच आयोजित करण्यात आलेला तीन दिवसाच्या शारदाबाई पवार कला महोत्सवाचा आज शानदार प्रारंभ झाला . यावेळी महापौर प्रशांत जगताप यांनी अश्विनी कदमांच्या पुढाकाराने सुरु झालेला हा शारदाबाई पवार कला महोत्सव दरवर्षी होईल अशी ग्वाही देवून सौ. कदम यांच्या कामाचे कौतुक केले . सहकारनगर मधील वाळवेकर लाँस शेजारील मैदानात हा महोत्सव प्रचंड गर्दीत संपन्न होतो आहे . आज येथे या महोत्सवाचे उद्घाटन चव्हाण नगर मधील ‘पंचवटी ‘ चे चेअरमन श्री महादेव पवार तसेच मान्यवर नागरिक यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. या महोत्सवाला महापौर तसेच खासदार वंदना चव्हाण ,उपमहापौर मुकारी अलगुडे ,नगरसेवक शिवलाल भोसले आदी मान्यवर कार्यकर्ते ,नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .या महोत्सवात प्रवीण तरडे लिखित आणि दिग्दर्शित ‘गोष्ट राकट महाराष्ट्राची ‘ हा कार्यक्रम आज सदर झाला ज्यामध्ये शिवराज्यभिषेक, रँडचां वध, विदेशी कपड्यांची होळी ,जाती निर्मूलनाचे कार्य दाखविणाऱ्या महानाटयांनी रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळविली . ज्यामध्ये भार्गवी चिरमुले, गिरीजा जोशी, ऋतुजा जोशी, मधुर दातार धवल चांदवडकर , संगीतकार निखील महामुनी अशा अनेक कलावंतांचा समावेश होता .
अश्विनी कदमांच्या पुढाकाराने सुरु झालेला शारदाबाई पवार कला महोत्सव दरवर्षी होईल -महापौर
Date: