पुणे :
सिंहगड रस्ता परिसरातील पायाभूत सुविधांच्या संदर्भात आवाज उठविण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाने शुक्रवारी हिंगणे चौकात घंटानाद आंदोलन केले . रासप महिला प्रदेशाध्यक्ष श्रद्धा भातंब्रेकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब कोकरे ,शहराध्यक्ष देवेंद्र धायगुडे भावेश पिंपळकर , अनंता चव्हाण शीतल चव्हाण ,आणि शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले.
विठ्ठलवाडी -माणिकबाग पूल ,सनसिटी -कर्वेनगर ओव्हरब्रिज ,विठ्ठलवाडी ते हायवे ओव्हरब्रीज, भाजी मंडई ,साईनगर ते सहकार नगर बोगदा अशा मागण्यांकडे लक्ष वेधण्यात आले .