पुणे, – राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि दिवंगत पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांना जयंतीदिनानिमित्त आज अभिवादन करण्यात आले.
पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी पुणे रेल्वे स्टेशन परिसरातील महात्मा गांधीजींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात विभागीय आयुक्त एस.चोक्कलींगम यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि दिवंगत पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला, जिल्हाधिकारी सौरभ राव, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.जय जाधव,निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे, उपायुक्त श्रीमती कविता द्विवेदी तसेच विभागीय आयुक्त कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा माहिती कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.