अध्यक्षपदी धनराज घोगरे तर उपाध्यक्षपदी ज्योत्स्ना एकबोटे यांची निवड

Date:

पुणे-पुणे महानगरपालिकेच्या नाव समितीच्या अध्यक्षपदी धनराज घोगरे तर उपाध्यक्षपदी ज्योत्स्ना एकबोटे यांची निवड झाली. महानगरपालिकेच्या नवीन इमारतीमध्ये शुक्रवारी ही निवडणूक प्रक्रिया पार पडली.
महापालिकेत सत्ताधारी असलेल्या भारतीय जनता पक्षाच्यावतीने अध्यक्षपदासाठी घोगरे यांना तर उपाध्यक्ष पदासाठी एकबोटे यांना संधी देण्यात आली होती. महाविकास आघाडीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे गणेश ढोरे यांना तर उपाध्यक्ष पदासाठी शिवसेनेचे विशाल धनवडे यांना उमेदवारी देण्यात आली होती.
भाजपच्या उमेदवारांना आठ तर महाविकास आघाडीच्या उमेदवारांना तीन मते पडली. महापालिकेचे सभागृह नेते गणेश बिडकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन विजयी उमेदवारांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांच्यासह समितीचे अन्य सभासद उपस्थित होते. पीठासीन अधिकारी म्हणून पीएमपीएमएल चे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी काम पाहिले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मिळकत कर,पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थावरुन प्रशासनाला धरले धारेवर…

LIVE - पुणे महापालिका मुख्य सभा 18 फेब्रुवारी 2026 पुणे...

वित्तीय समिती रद्द करा नगरसेवकांची पहिल्याच सभेत मागणी

पुणे - आज पुणे महापालिकेची पहिली सर्वसाधारण सभा आयोजित...

जगदाळे कुटुंबासह खासदार मेधा कुलकर्णी यांनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट

पुणे: पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडित जगदाळे कुटुंबातील प्रगती जगदाळे...