माणगाव तालुक्यातील गोरेगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या सुधारित आराखडा मान्यतेबाबत त्वरित कार्यवाही करा

Date:

मुंबई, दि. 30 : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक माणगाव तालुक्यातील गोरेगाव येथे उभारण्याबाबत सुधारित आराखडा समाजकल्याण आयुक्तालयाच्या मान्यतेसाठी सादर करावा व स्मारक उभारणीबाबत कार्यवाही त्वरित करण्यात यावी, असे निर्देश सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले.

रायगड जिल्ह्यातील गोरेगाव विभाग (ता. माणगाव) येथील पंचशील बौद्धजन सेवा संघ, स्वयंसेवी संस्थेमार्फत स्मारक उभारणे व विविध लोकोपयोगी उपक्रमाबाबत आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीदरम्यान श्री.मुंडे बोलत होते. यावेळी पर्यटन राज्यमंत्री तथा रायगड जिल्हा पालकमंत्री कु. आदिती तटकरे व खासदार सुनिल तटकरे उपस्थित होते.

श्रीवर्धन राज्यमार्गाला लागून असलेल्या मौजे गोरेगाव येथे पंचशील बौद्धजन सेवासंघाच्या जागेवर 1985 मध्ये संस्थेची इमारत उभारण्यात आली होती. या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सभा घेतली होती. अशा या ऐतिहासिक स्थळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारुन बहुद्देशीय इमारत बांधण्याचा संस्थेचा संकल्प आहे. या स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचे बांधकाम संस्थेमार्फत पूर्ण झाले असून उर्वरित इमारत बांधकामाकरिता अनुदान मिळण्याबाबत संस्थेच्या वतीने विनंती करण्यात आली आहे.

यावेळी राज्यमंत्री तथा पालकमंत्री कु. तटकरे म्हणाल्या, या बहुद्देशीय स्मारक व इमारतीसाठी नव्या आराखड्यानुसार निधी देण्यात येणार आहे. या बहुद्देशीय प्रकल्पातून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक प्रबोधनाचे कार्य घडेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

बैठकीस सामाजिक न्याय विभागाचे प्रधान  सचिव श्याम तागडे, सहसचिव दि. रा. डिंगळे, अवर सचिव अ.कों. अहिरे, पंचशील बौद्धजन सेवा संघाचे अध्यक्ष विकास गायकवाड, संघाचे सचिव संदिप साळवी, श्री. बापू सोनगिरे व संबधित अधिकारी उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मिळकत कर,पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थावरुन प्रशासनाला धरले धारेवर…

LIVE - पुणे महापालिका मुख्य सभा 18 फेब्रुवारी 2026 पुणे...

वित्तीय समिती रद्द करा नगरसेवकांची पहिल्याच सभेत मागणी

पुणे - आज पुणे महापालिकेची पहिली सर्वसाधारण सभा आयोजित...

जगदाळे कुटुंबासह खासदार मेधा कुलकर्णी यांनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट

पुणे: पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडित जगदाळे कुटुंबातील प्रगती जगदाळे...