बॉलीवूडचे अनेक कलाकार होणार सहभागी
मुंबई : कारगिल विजय दिवस 26 जुलै रोजी साजरा करण्यात येतो. याच पार्श्वभूमीवर हिंदी व मराठी सिनेमा/दूरदर्शन क्षेत्रातील कलाकार विरुद्ध सैन्यदल संघ यांच्यात फुटबॉल सामना रंगणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत फुटबॉल सामना रंगणार आहे.
अभिषेक बच्चन, रणबीर कपूर, अर्जुन कपूर, अरमान रल्हान, दिनू मोरीया, शशांक खैतान, आहन शेट्टी, अरमान जैन, अपारशक्ती खुराना, ॲन्टोनो पेकॉरा, मार्क रॉबिनसन, शब्बीर अहलूवालिया, विक्रम थापा, अभिमन्यू दासानी, करण वाही, इशान खट्टर, आदित्य सील, हरप्रित बावेजा असे प्रसिद्ध बॉलीवुड कलाकार या सामन्यामध्ये सहभागी होणार आहेत.
फुटबॉल सामना 26 जुलै रोजी कूपरेज मैदान, महर्षी कर्वे रोड, डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक क्षेत्र, नरिमन पॉईंट, मुंबई येथे संध्याकाळी 6.30 वाजता होणार आहे. माजी सैनिक/विधवा तसेच कुटुंबियांना हा सामना पाहण्यासाठी मोफत प्रवेश दिला जाणार आहे. मुंबई शहर, मुंबई उपगनर, ठाणे जिल्ह्यातील माजी सैनिक/ विधवा तसेच त्यांच्या कुटुंबियांनी फुटबॉल सामना पाहण्यासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन मुंबई शहराच्या जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.