रोटरी क्लब ऑफ पुणे युनिव्हर्सिटीच्या अध्यक्षपदी देवव्रत शहाणे

Date:

पुणे.- रोटरी क्लब ऑफ पुणे युनिव्हर्सिटीचे अध्यक्षपद देवव्रत शहाणे यांनी माजी अध्यक्षा दीपा गाडगीळ यांच्याकडून स्विकारले. पी.वाय.सी हिंदू जिमखानाच्या सभागृहात हा समारंभ संपन्न झाला.

या कार्यक्रमास सन्माननीय अतिथी म्हणून मराठी कलाकार सुनील बर्वे, तर रोटरी जिल्हा ३१३१ चे २०१६-१७ चे प्रांतपाल प्रशांत देशमुख प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच माजी प्रांतपाल विनय कुलकर्णी, दिपक शिकारपूर, कल्याण वर्दे, सुधीर राशींगकर, सुभाष सराफ आणि १७-१८ चे प्रांतपाल अभय गाडगीळ, १८-१९ चे प्रांतपाल डॉ.शैलेश पालेकरांसह अनेक जिल्ह्यातील अधिकारी वर्ग उपस्थित होता

वर्षभरात राबवल्या जाणाऱ्या प्रकल्पांविषयी माहिती देताना नव अध्यक्ष देवव्रत शहाणे म्हणाले की, शाळांसाठी मोबाईल व्हँन लायब्ररी, खेड्यांमध्ये पाण्यासाठी बंधारे बांधणे, अंधमुलींसाठी व्यावसायिक व वैद्यकीय सहाय्य अशा प्रकारचे अनेक सामाजिक उपक्रम आम्ही वर्षभर राबवणार आहोत. समाजामधील सर्व स्तरातील लोकांना या उपक्रमाचा फायदा होईल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

प्रकल्प आणि कार्यक्रमाविषयी माहिती घेत असताना सुनील बर्वे यांनी रोटरी विषयी आस्थेने विचार मांडले आणि त्यांना युनीव्हर्सिटी क्लबचे सन्माननीय सदस्यत्व बहाल करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना प्रांतपाल प्रशांत यांनी देवव्रत शहाणे यांच्या कामाचे कौतुक केले आणि शुभेच्छा दिल्या. यावेळी दीपा गाडगीळ यांनी मागील काही वर्षांच्या कामाचा आढावा घेतला.

कार्यक्रमाच्या सुरवातीस सरस्वतीचे स्तवन मंजिरी शहाणे यांनी म्हटले तर सुत्र संचालन डॉ. सुप्रिया खेपुर यांनी केले. २०१७-१८ वर्षातील अध्यक्ष पल्लवी देशपांडे यांनी आभार मानले.

index

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

कोलंबो परिषदेसाठी काँग्रेसचे नगरसेवक सुनील शिंदे यांची निवड!

पुणे- महापालिकेतील कॉंग्रेसचे नगरसेवक आणि कामगार नेते सुनील...

राज्यात 1 ते 15 मे 2026 या कालावधीत स्व-गणना, तर घरोघरी जाऊन घरांची यादी आणि गृहगणना 16 मे ते 14 जून 2026 दरम्यान होणार

मुंबई, महाराष्ट्र जनगणना संचालन संचालनालयाने आज मुंबईत पत्रकार परिषदेचे आयोजन...

येरवड्यातील लुंबिनी उद्यानात भीमगीतांची ‘धम्म संध्या’ उत्साहात संपन्न

बुद्ध जयंतीनिमित्त माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, नगरसेविका नंदिनी...

परिवर्तन पॅनलचा दणदणीत विजय

जिल्हा परिषद सेवकांची सहकारी पतसंस्था:चेअरमन पदासाठी प्रदीप गोलांडे आणि...