बँकांच्या ‘सीएसआर’ निधीतील कामांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुण्यात लोकार्पण संपन्न

Date:

पुणे, दि. २६ : विविध खासगी बँकांनी सामाजिक बांधिलकी राखत त्यांच्या ‘सीएसआर’ (सामाजिक उत्तरदायित्व निधी) फंडातून ‘कोविड-१९’च्या लढाईसाठी केलेल्या कामांचे उद्घाटन तसेच विविध उपकरणांचे लोकार्पण उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. विधान भवनाच्या (कौन्सिल हॉल) सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमास आमदार चेतन तुपे, अण्णासाहेब बनसोडे, जमाबंदी आयुक्त एस. चोक्कलिंगम, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, पिंपरी चिंचवडचे मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, ससूनचे अधिष्ठाता डॉ.मुरलीधर तांबे, बंधन बॅंकेचे प्रादेशिक प्रमुख सत्यजित मोहिते, एचडीएफसी बॅंकेच्या राज्य प्रमुख स्वाती शाळीग्राम, लोकप्रतिनिधी, अधिकारी उपस्थित होते.

‘कोविड-१९’ विरुद्धच्या लढाईत सामाजिक बांधिलकी राखत समाजातील सर्वस्तरातील व्यक्ती आणि संस्थांनी मदतीचा हात देण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत एचडीएफसी, बंधन बॅंक, ॲक्सिस बॅंक या बँकांनी आपल्या ‘सीएसआर’ निधीचा मोठा वाटा ‘कोविड-१९’च्या लढ्यासाठी उपलब्ध करुन दिला. या निधीच्या माध्यमातून ‘कोविड-१९’ लढ्यासाठी आवश्यक असणारी विविध उपकरणे आणि आवश्यक सामुग्री उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ‘ॲक्सिस बँके’च्या माध्यमातून ‘कोविड आणि स्वच्छ भारत’ अभियानासाठी उभारण्यात आलेल्या टेक्नोपर्पल नियंत्रण प्रणालीचे ई-उद्घाटन करण्यात आले. तसेच ‘बंधन बँके’च्या माध्यमातून दळवी रुग्णालयात लावण्यात आलेल्या ९८ पॉईन्ट असलेल्या जम्बो ऑक्सिजन यंत्रणा तसेच ससून रुग्णालयात लावण्यात आलेल्या ड्युरा सिलेंडरच्या वाफेच्या यंत्रणेचे ई-उद्घाटन आणि ‘एचडीएफसी’ बँकेच्या माध्यमातून लायगुडे रुग्णालयाला पुरविण्यात आलेल्या दोन ऑक्सिजन जनरेटरचेही ई-उद्घाटन करण्यात आले. त्याचबरोबर ‘बंधन बँके’च्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या सामुग्रीसह ‘कोविड’ जनजागृतीची यंत्रणा असलेल्या दूरदर्शन संचाचेही लोकार्पण करण्यात आले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ‘एचडीएफसी’ बँकेच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या एचएएल मशीन, संगणक संच, पोर्टेबल एक्स-रे मशीन, इसीजी मशिन, पुणे शहरासाठीचे दोन मोबाईल क्लिनीक, कार्डीयाक रुग्णवाहिका, शव वाहिका, निगेटिव्ह आयोन जनरेटरचे लोकार्पण करण्यात आले.. यावेळी ‘कोविड’च्या काळात करण्यात आलेल्या विविध कामांसंबंधिची लघू चित्रफित दाखविण्यात आली. यापूर्वीही एचडीएफसी, बंधन बँक, ॲक्सिस बँकांसह इतर संस्थांनी ‘कोविड-१९’च्या लढ्यासाठी मोठी मदत केली आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशेष कार्य अधिकारी कौस्तुभ बुटाला यांनी केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

६० कोटी जास्त दर दिलेल्या अशोक लेलॅंडला PMPML च्या 1 हजार बसची ऑर्डर ?

पुणे- सध्या PMPML विविध मार्गाने प्रसिद्धी झोतात आहे. बेकायदा...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनाच्या विस्तारीकरणासाठी महापालिका प्रशासन आग्रही

भूखंडाचा वाणिज्य झोन PSP करण्यासाठी राज्य सरकार कडे...