पुणे: प्रभाग क्रमांक १४ मध्ये असलेल्या गोखलेनगर ( चाळ विभाग) रामोशीवाडी,मुकेश नगर ३९१,हेल्थ कँम,गुंजाळवाडी,हनुमान नगर ,पी एम सी कॉलनी,महाले नगर या ठिकाणी रहात असलेल्या जेष्ठ नागरिकांसाठी मोफत कोरोना प्रतिबंधक लसीकरण केंद्र,प्रभागाच्या मध्य भागी असलेल्या संत रामदास स्वामी प्राथमिक विद्यालय येथे तातडीने सुरु करण्यात यावे अशी मागणी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याकडे करण्यात आली
यावेळी विशाल गोसावी,रोहित लिंबोळे , ईश्वर बनपट्टे, प्रशांत लाटे,अमृता म्हेत्रे आदी मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते . यावेळी महापौर यांनी संबधित भागात मोफत कोरोना लसीकरण केंद्र त्वरीत सुरु करण्याबाबत अधिकाऱ्यांना सुचना केल्या.