पूनावाला यांनी पुण्याला लस विनामुल्य देऊन पुण्यासाठी योगदान द्यावे
पुणे- चंद्रकांत पाटलांनी भान ठेऊन जबाबदारीने बोलले पाहिजे, बेताल वक्तव्य करू नये असे सांगत राहुल गांधींना कोरोना झाल्याने त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे या भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याचा पुणे शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे यांनी कडक शब्दात निषेध केला आहे . संघाचे भागवत तसेच अमित शहा यांनाही कोरोना झाला होता .हे त्यांनी लक्षात घेतले पाहिजे .
ते पुढे म्हणाले ,केंद्र सरकारसाठी पूनावाला यांनी लाशीचे दर दीडशे रुपये तर राज्य सरकारसाठी ४०० रुपये आणि खाजगी रुग्णालयांसाठी ६०० रुपये दर निश्चित केल्याचे वृत्त आहे यामुळे हा दुजाभाव का ? असा सवाल निर्माण करत राहुल गांधी यांनी हरकत घेतली .हे बरोबरच आहे उलट पूनावाला यांनी हि लस पुणे शहराला आपले शहर म्हणून विनामुल्य द्यायला हवी .असे असताना चंद्रकांत पाटलांचे बेताल वक्तव्य निषेधार्ह आहे……. पहा आणि ऐका रमेश बागवे नेमके काय म्हणाले त्यांच्याच शब्दात ….