पुणे-
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पुणे शाखेच्या पंचवार्षिक निवडणुकीनंतर अध्यक्षपदावर महिला कलाकाराचीच नियुक्ती करण्याचा निर्णय ‘रंगधर्मि पॅनेलने एकमताने घेतवा आहे. अशी माहिती या पॅनलच्या उमेदवार श्रीमती शुभांगी दामले व श्रीमती भाग्यश्री देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली.
येत्या रविवारी होणाऱ्या या निवडणुकीत ”रंगधर्मि पॅनलला सर्व स्तरातून वाढता पाठिंबा मिळत असून विजय निश्चित होणार असल्याचे यावेळी सांगितले. यावेळी पॅनलचे मार्गदर्शक व नाट्य परिषदेचे माजी अध्यक्ष,पुण्याचे माजी उपमहापौर डॉ. सतीश देसाई, प्रमोद आडकर,मोहन कुलकर्णी ,रोहन मंकणी,वरिष्ठ पत्रकार नंदकुमार काकिर्डे व अन्य उमेदवार उपस्थित होते.
श्रीमती दामले यांनी सांगितले, रंगधर्मी पॅनलला-सिने क्षेत्रातील विविध मान्यवरांचा जाहीर पाठिंबा मिळत आहे. ज्येष्ठ इतिहासकार बाबासाहेब पुरंदरे. सिने व नाट्य कलावंत डॉ.मोहन आगाशे, सतीश आळेकर, सुचेता चाफेकर, डॉ. निलेश रावळे, प्राजक्ता माळी व अन्य अनेक कलावंतांनी रंगधर्मी पॅनलला जाहीर पाठिंबा दिला असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी रंगधर्मिच्या जाहीरनाम्याबाबत बोलताना परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. रातीश देसाई म्हणाले की, त्यांच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत त्यांच्या कार्यकारिणीने विविध पावित्र्यपूर्ण उपक्रम हाती घेऊन शाखेच्या कार्याचा विस्तार केला होता.
परिषदेच्या कार्यालयाचे नुतनीकरण, डॉ. श्रीराम लागू, लालन सारंग, श्रीकांत मोघे, प्रभाकर पणशीकर व अन्य काही कलावंतांच्या डीव्हीडी तयार करून नाट्यक्षेत्राचा वारसा जतन करण्याचे काम करण्यात आले. त्याचप्रमाणे जागतिक रंगभूमीदिनानिमित्त ज्येष्ठ कलावंत, पडद्यामागचे सहाय्यक यांचा सत्कार करण्यात आला. नाट्य महोत्सवांचे आयोजन करण्यात आले. रंगधमी पॅनेलच्या आगामी योजनांची माहिती यावेळी देण्यात आली. त्यामध्ये पुण्यातून दर्जेदार नाटकांची निर्मिती, नाट्यलेखन, दिग्दर्शन, अभिनय, नृत्य, संगीत, एकपात्रप्रयोग यांच्या कार्यशाळा. बालकलाकारांसाठी बरमहा मोफत नाट्य शिखरेयुवा पिढीला मार्गदर्शन, नाट्य परिषद अद्ययावत कार्यालय, पुणे महानगरपालिकेच्या ताब्यातील विविध नाट्यगृहांमध्ये स्वच्छता, विविध प्रेक्षकांसाठी सोई-सुविधा निर्माण करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.