धीरज फटांगरे, अभिषेक ताटे, यश बोरामणी विजयाचे शिल्पकार
पुणे- पाथ-वे फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित एम 3 करंडक आंतर क्लब 23 वर्षांखालील निमंत्रित क्रिकेट स्पर्धेच्या सुपरलीग फेरीत पहिल्या सामन्यात धीरज फटांगरे(60 धावा व 1-37) याने केलेल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर डेक्कन जिमखाना संघाने युनायटेड स्पोर्ट्स क्लब संघाचा 7 गडी राखून पराभव करत विजयी सुरुवात केली.
डेक्कन जिमखाना क्रिकेट मैदानावर झालेल्या या सामन्यात डेक्कन जिमखाना संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. डेक्कन जिमखाना संघाच्या भेदक गोलंदाजी व क्षेत्ररक्षणापुढे युनायटेड स्पोर्ट्स क्लब संघाचा डाव 43.3षटकात 231 धावावर कोसळला. सलामीचे फलंदाज झटपट बाद झाल्यानंतर अद्वैय शिधये(55धावा) व आदित्य राजहंस(45धावा) यांनी तिसऱ्या गड्यासाठी 82चेंडूत 88 धावांची भागीदारी करून संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण हे दोघेही बाद झाल्यावर आनंद ठेंगेच्या 49 धावा वगळता एकही फलंदाज मोठी खेळी करू शकला नाही. डेक्कन जिमखानाच्या यश बोरामणी(3-30), अजय बोरुडे(2-46), रोहन फंड(2-56), यश शितोळे(1-18), धीरज फटांगरे(1-37), रिषभ शर्मा(1-24)यांनी अचूक गोलंदाजी करत युनायटेड स्पोर्ट्स क्लबला 231 धावावर रोखले.
षटकामागे 5.13 सरासरी धावगतीचे आव्हान डेक्कन जिमखाना संघाने केवळ 33.5षटकात 3बाद 232धावा करून पूर्ण केले. यात सलामवीर धीरज फटांगरे याने सुरेख फलंदाजी करत 48 चेंडूत 8चौकार व 3 षटकारांच्या 60 धावा करून संघाला सुरेख सुरुवात करून दिली. धीरज याने यश बोरामणी(29)च्या साथीत पहिल्या गड्यासाठी 81चेंडूत 84 धावांची भागीदारी करून संघाच्या विजयाचा पाया रचला. हे दोघेही बाद झाल्यानंतर डेक्कन जिमखाना संघ 25 षटकात 3बाद 152 असा सुस्थितीत होता व संघाला विजयासाठी 79 धावांची आवश्यकता होती. त्यानंतर अभिषेक ताटेने 52चेंडूत 6चौकार,2 षटकारांच्या मदतीने नाबाद 59धावा व हर्ष संघवीने 25चेंडूत 4चौकार व 2 षटकारांच्या मदतीने नाबाद 37 धावा केल्या. या जोडीने चौथ्या गड्यासाठी 54चेंडूत 80 धावांची भागीदारी करून संघाला एकहाती विजय मिळवून दिला. युनायटेड स्पोर्ट्स क्लबकडून संकेत यशवंती(1-43), आनंद ठेंगे(1-49), आदित्य मोरे(1-53) यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. सामन्याचा मानकरी धीरज फटांगरे ठरला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: सुपरलीग फेरी: युनायटेड स्पोर्ट्स क्लब: 43.3षटकात सर्वबाद 231 धावा(अद्वैय शिधये 55(48,4×4,2×6), आदित्य राजहंस 45(69,7×4), आनंद ठेंगे 49(29,3×4,4×6), महेश मस्के 21(44,3×4,1×6), ओंकार मोहळ 19(18), यश बोरामणी 3-30, अजय बोरुडे 2-46, रोहन फंड 2-56, यश शितोळे 1-18, धीरज फटांगरे 1-37, रिषभ शर्मा 1-24) पराभूत वि.डेक्कन जिमखाना: 33.5षटकात 3बाद 232धावा(धीरज फटांगरे 60(48,8×4,3×6), अभिषेक ताटे नाबाद 59(52,6×4,2×6), स्वप्नील फुलपगार 38(40, 4×4), यश बोरामणी 29(39,4×4), हर्ष संघवी नाबाद 37(25,4×4,2×6), संकेत यशवंती 1-43, आनंद ठेंगे 1-49, आदित्य मोरे 1-53);सामनावीर-धीरज फटांगरे; डेक्कन जिमखाना 7 गडी राखून विजयी.
27 जानेवारी 2021 रोजीचे सामने डेक्कन जिमखाना वि.केडन्स, डेक्कन जिमखाना मैदान; क्लब ऑफ महाराष्ट्र वि.अँबिशियस क्रिकेट अकादमी, नेहरू स्टेडियम मैदान.