क्रेडाई पुणे-मेट्रोच्या कार्यशाळेत जीएसटीवर सेवाकर अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन

Date:

पुणे– ‘जीएसटी‘चा आढावा आणि जीएसटी मायग्रेशन यावरील संवादात्मक कार्यशाळेचे आयोजन नुकतेच क्रेडाई–पुणे मेट्रोच्या सभागृहात  करण्यात आले होते. यावेळी क्रेडाई–पुणे मेट्रोचे २४७  सदस्य व त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या कार्यशाळेत सेवा कर आयुक्त श्री. एन. श्रीधर आणि सेवा कर उपायुक्त  के. रामाराव यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

क्रेडाई–पुणे मेट्रोचे संयुक्त चिटणीस  अतुल गोयल यांनी माननीय सेवा कर आयुक्त  एन. श्रीधर यांचे स्वागत आणि सत्कार केला यावेळी  एन. श्रीधर यांनी जीएसटीचे महत्त्व विशद केले आणि सर्वांना ‘जीएसटी‘ अंतर्गत नोंदणी करण्याचे आवाहन केले. सेवा कर आयुक्त कार्यालय, वाडिया कॉलेज,  येथे ६ ते ९ एप्रिल पर्यंत १० ते ६ यावेळेत जीएसटी मायग्रेशन मेळाव्याचे आयोजन केले असल्याचेही त्यांनी पुढे सांगितले. सर्व सेवा करदात्यांनी जीएसटीकडे जाण्यासाठी हा मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यात जागेवर नोंदणी करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्राधिकृत व्यक्तीच्या ईमेल व मोबाइलद्वारे येथे नोंदणी करता येईल. सर्वांनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

के. रामाराव यांनी उदाहरण देऊन  मायग्रेशन प्रक्रिया विशद केली आणि प्रत्येकाला जीएसटी (वस्तू आणि सेवा कर) हा विषय उलगडून सांगितला. जीएसटी नोंदणी प्रक्रिया त्यांनी विशद करून सांगितली. तसेच, के रामाराव यांनी जीएसटीची कार्यप्रणाली समजावून सांगितली. सदस्य व त्यांच्या प्रतिनिधींच्या शंकांचे निरसन  श्री. के. रामाराव यांनी केले.

जीएसटी मायग्रेशनबाबत क्रेडाई–पुणे मेट्रोचे सदस्य आणि त्यांच्या प्रतिनिधींचे मार्गदर्शन केल्याबद्दल डॉ. डी. के. अभ्यंकर यांनी सेवा कर अधिकाऱ्यांचे आभार मानले. उपस्थितांनी आपले प्रश्न क्रेडाई–पुणे मेट्रो सचिवालयाला पाठवावेत, ते संकलित करून सेवा कर विभागाकडे पाठवले जातील, अशी विनंती त्यांनी केली. सदस्य आणि त्यांच्या प्रतिनिधींचेही त्यांनी आभार मानले.

 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मुंबईत अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार! अभिनेता सुरक्षित, हल्लेखोरांचा शोध सुरू

दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांकडून गोळीबार झाल्याचे वृत्त; चालकासह दोघे जखमी...

श्री महालक्ष्मी मंदिरातर्फे आयोजित आरोग्य शिबीरात ३५० महिलांची तपासणी

नवरात्रोत्सवानिमित्त महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर ; श्री महालक्ष्मी...

महाराष्ट्रात पुन्हा वादळी पावसाचे सावट! कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात यलो अलर्ट

रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगलीसह अनेक जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाची...

पुण्यात ऑक्टोबर हीटचा तडाखा! पावसाची विश्रांती, उन्हाचा चटका वाढला; तापमान ३४ अंशांवर

पुणेकर उकाड्याने हैराण; पुढील दोन दिवसही तापमान ३३ ते...