राष्ट्रवादी काँग्रेसचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.
ट्विट करत छगन भुजबळ यांनी ही माहिती दिली आहे.
छगन भुजबळ आपल्या ट्विटमध्ये म्हणाले, माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती उत्तम आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वैद्यकीय उपचार सुरू असून आपणा सर्वांच्या आशिर्वादाने कोरोनावर मात करून लवकरच मी बरा होईल. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी काळजी घ्यावी व लक्षणे दिसल्यास तात्काळ आपली कोरोना चाचणी करून घ्यावी.